(फोटो सौजन्य: Instagram)
मालिकेत बऱ्याच एपिसोडमध्ये दया आपल्या आईशी काॅलवर बोलते. काही एपिसोडमध्ये ती तिच्या माहेरी जाते, कधी तिची आईच मुंबईला आल्याचे दाखवले जाते पण या सगळ्यात आईचा चेहरा मात्र गुलदस्त्याच असतो. हेच कारण आहे की चाहत्यांना नेहमीच दयाबेनच्या आईला पाहण्याची ओढ लागलेली असते. अशातच आता सोशल मिडियावर एका यूजरने एक तारक मेहता मालिकेतील एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात दयाबेनच्या आईचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
ही क्लिप ३९४ व्या एपिसोडची असल्याचे सांगितले जात आहे. याच दयाबेन नेहमीप्रमाणे आपल्या आईशी काॅलवर गप्पा मारत असते पण यावेळी आईचा चेहरा मात्र व्हिडिओत दाखवण्यात आलाय. सात-आठ सेकंदांच्या या दृष्यात आपल्याला आईची झलक दिसते ज्यावरुन आपण दयाबेनच्या आईचा चेहरा स्पष्टपणे पाहू शकता. चाहत्यांनी आता हा व्हिडिओ पाहून वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काहींना या दृष्यांवर विश्वास बसत नाहीये तर काही व्हिडिओतील महिलेला दयाबेनची आई नसून शेजारी असल्याचे म्हणत आहेत.
हा व्हिडिओ @whassup_neeraj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘शेवटी आज गुपित उघड झाले…’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ती ‘मा’ नाही, तर ‘बा’ म्हणतेय; आणि ती तिची शेजारीण आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ही दयाची आई नाही, ती दुसरीच कोणीतरी आहे, संपूर्ण एपिसोड बघा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता पोपटलालचं लग्नही लावून द्या म्हणजे शांतीने मरता येईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






