फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे लोकांना रिल्स बनवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंट करायला देखील मागचा पुढचा विचार करत नाहीत. यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये विशेषत: तरूण मंडळींचा समावेश आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्या काही तरूणांनी बाईकवर असा स्टंट केला आहे की, यामुळे त्यांच्या जीव देखील जाऊ शकतो. तसेच त्यांच्यासोबतच बाईकवर बसलेल्या मुलींचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. असे व्हिडिओ पाहून फक्त एकच प्रश्न पडतो की खरेच जीव एवढा स्वस्त झाला आहे. अशा व्हिडिओंमुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या तरूणांना ट्रोल केले आहे. अनेक वेळा असे स्टंट अपघाताचे कारण बनतात. असे असतानाही काही तरुण आपल्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवून असे व्हिडिओ बनवतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरूणांनी आपापल्या बाईकवर आपल्या प्रेयसीला बसवले आहे. हे तरूण बाईक अतिशय वेगाने धूम स्टाईलमध्ये गाडी चालवत आहेत. व्हिडिओ पाहाताना तुमच्या लक्षात येईल की, एका तरूणीला बाईक हवेत उचचली गेल्यावर आदळते तेव्हा चांगलाच फटका बसतो. हा स्टंट अत्यंत धोकादायक आहे. जर अचानक कोणाचा तोल गेला तर अपघात होण्याची शक्यता आहे. या तरूणांना गंभीर दुखापत होऊ शकते. असे असूनही तरुणांचा हा धोकादायक स्टंट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- Viral Video: शिकारीसाठी दोन पक्ष्यांमध्ये झुंज; एक अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात कैद
व्हायरल व्हिडिओ
इसकी गर्ल फ्रेंड की भी हिम्मत देखो बैठी ही रही 🧐🤣
में पूरा वीडियो ही इसलिए देखी की गिरेंगे कब 🤔
लेकिन गिरे हुए लोग गिरते कहां 🤣🤣 pic.twitter.com/UYPLQTVF0h— Ragini Singh (@Ragini1Im) November 3, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ragini1Im या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चुकून जर गाडी स्लीप झाली तर केवढ्यात पडेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यामुळए समाजात चुकीचा संदेश जात आहे. आणखी एका युजरने त्यांना ट्रोल करणाऱ्यांना म्हटले आहे की, तुम्ही जर व्हिडिओ लाईक नाही केला किंवा पाहिला नाही तर लोक असे व्हिडिओ बनवणार नाहीत. तर चौथ्या एकाने यावर आपले समर्थन दर्शवत म्हटले आहे की, त्यांच्यासोबत आपलीपण जबाबदारी आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.