किळसवाणं कृत्य! तरुणाने टॉयलेटच्या पाण्यात बिस्किट बुडवलं अन्...; Video पाहून कोणालाही उलटी येईल(फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणीही काहीही करायला तयार असते. कधी धोकायदायक स्टंट, तर कधी विचित्र स्टंट लोक करत असतात. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. अनेकदा काही धोकादायक स्टंटमुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे तर किळसवाण्या कृत्यांमुळे देखील गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. सध्या असाच एका तरुणाचा किळसवाणा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाने असे काही केलं आहे की पाहून तुम्हाला उलटी येईल.
हा तरुण टॉलेटमध्ये बसून घाणेरंड कृत्य करत असून याने बिस्कीट टॉयलेटच्या पाण्यात बुडवले आहे. मात्र, पुढे त्यानं जे केलं पाहून अक्षरश: तुम्हाला किळस येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण टॉयलेटमध्ये गेला आहे. त्याच्या हातात पारलेजीचे बिस्कीट आहे. तरुण आधी पारलेचे बिस्कीट टॉयलेटच्या पाण्यात बुडवतो आणि मग ते बिस्किट खातो. तो हे सगळं असे करत आहे की, कोणतातरी चविष्ट पदार्थ तो खात आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही उलटी येईल. तरुणाचा हा व्हिडिओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी हा अन्नाचा अपमान असल्याचे म्हणते तरुणावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hydeler या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने अन्नाचा अपमान केल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने बॅक्टेरिया देखील त्याला घाबरले असतील. आणखी एका युजरने, येडं बिडं झालं की काय हे असे म्हटले आहे. चौथ्या एका युजने मला तर याचे तोंड पाहूनच उलटी आली असे म्हटले आहे. काहींनी अलीकडे फेमस होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही असे म्हटले आहे. यापूर्वी देखील एका पुनित सुपरस्टारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा तरुण देखील कधी शेण, तर कधी गटरसोबत ब्रेड, चपाती, बिस्किट खाऊन टाकत होता. यामुळे एका युजरने पुनित सुपरस्टारचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.