(फोटो सौजन्य: Instagram)
कारप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महिंद्रा थार ही अत्यंत लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. प्रत्येकाची आयुष्यात एकदा तरी ही कार खरेदी करण्याची इच्छा असते. अशातच एका महिलेने आपली ही इच्छा पूर्ण केली खरी पण क्षणातच एक चूक तिच्या या स्वप्नाच्या अशी आड आली की काही सेकंदातच तिच्या सर्व स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड करत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं?
ही घटना दिल्लीमधील निर्माण विहार या ठिकाणी घडली आहे. तर झालं असं की, २९ वर्षीय महिलेने स्वतःसाठी १५ लाखांची थार कार खरेदी केली. तिला ही गाडी ठराविक मुहूर्तावरच शोरूमच्या बाहेर काढायची होती. आता परंपरेनुसार, कार खरेदी केल्यानंतर एक लिंबू गाडीच्या चाकाखाली चिरडला जातो, असं करणं शुभ मानलं जात आणि असंच काहीस महिलेनेही आपल्या थारसोबत करू पाहिलं पण पुढे जे घडलं ते सर्वांनाच धक्का देणारं होत… विधी करण्याच्या नादात महिलेने चुकून एक्सिलेटरवर जोरात पाय दिला आणि इथेच तिच्याकडून मोठी चूक घडली. असं केल्यामुळे पुढच्याच क्षणी पहिल्या मजल्यावरून कार खाली कोसळली आणि गाडीचा पूर्ण चुराडा झाला. यामुळे फक्त महिलेचेच नाही तर शोरूमचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही मोठी दुखापत झाली नाही फक्त महिलेचे आणि शोरूमचे आर्थिक नुकसान झाले.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @timesofindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लिंबूला काही झाले तर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “डिलिव्हरी नेहमी ग्राउंड फ्लोअरवरच व्हायला हवी. हा ड्रायव्हर आणि शोरूम दोघांचाही निष्काळजीपणा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं ते आधीच डिलिव्हर झालं असेल आता विमा संपूर्ण नुकसान भरपाई देईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.