मुर्खपणाचा कळस! रीलसाठी रेल्वे रुळावर झोपून ट्रेनच्या खालून येण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक घटनेचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या स्टंटबाजीचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये विशेष करुन तरुणांचा समावेश असतोय. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. परंतु तरीही लोक स्टंटबाजी करणे सोडत नाही. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा थरारक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण रेल्वेरुळावर झोपला असून रेल्वेवरुन जात असताना बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. याच वेळी बाहेर एक व्यक्ती उभा आहे, जो याचा व्हिडिओ बनवत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा रेल्वे रुळावर झोपला आहे. त्याच्यावरुन एक ट्रेन जात आहे. तरीही तो ट्रेन कालून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. दोन वेळा या प्रयत्नांमध्ये त्याच्या डोक्याला देखील लागल्याचे दिसून येते. पण तरीही तरुणाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही. तरुण आधी आपली बॅग रेल्वेखालून बाहेर फेकतो आणि नंतर रेल्वे खालून गोल फिरत स्वत: बाहरे येतो. व्हिडिओवरुन असेही वाटते की, रेल्वे रुळ क्रॉस करताना कदाचित तरुण खाली अडकला असावा. परंतु त्याच्या बाहेर येण्याच्या प्रयत्नामुळे भयंकर अपघात घडला असता. पण त्याल कोणतीही काळजी वाटत नाही. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
यमराज की बुआ का लड़का 💀 pic.twitter.com/jGc9c2nWYn
— Ankit (@revengeseeker07) June 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @revengeseeker07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यमराजच्या मावशीचा मुलगा आहे वाटतं असे म्हटले आहे. एका युजरने खतरों के खिलाडी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने याची यमराजशी ओळख आहे वाटतं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.