Sudanese Military Aircraft Crashed: सुदानमध्ये लष्करी विमान कोसळले; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
खार्तूम : सुदानचे लष्करी विमान ओमदुरमन शहरात कोसळले. या अपघातात 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लष्कर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) या घटनेची माहिती दिली होती. एपीच्या वृत्तानुसार, लष्कराने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या अपघातात लष्करी जवान आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामागील मुख्य कारणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुदानी लष्कराच्या अहवालानुसार, लष्कराचे अँटोनोव्ह विमान मंगळवारी (24 फेब्रुवारी 2025) ओमदुरमनच्या उत्तरेकडील वाडी सय्यदना एअरबेसवरून उड्डाण घेत असताना क्रॅश झाले.
सुदानचे लष्करी विमान ओमदुरमन शहरात कोसळले. या भीषण अपघातात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामागचे कारण समोर आलेले नाही. तथापि, यापूर्वी सुदानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह ओमदुरमन येथील नाऊ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. यासह पाच नागरिकही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांचा भारतासोबत डबल गेम! PM मोदींना F-35 ची ऑफर देऊन पाकिस्तानला ‘या’ कारणासाठी दिले लाखो डॉलर्स
सुदानमध्ये गेल्या 2 वर्षांपासून गृहयुद्धाची परिस्थिती
सुदान 2023 पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे. येथे लष्कर आणि कुख्यात निमलष्करी गट, रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) यांच्यातील तणावाचे युद्धात रूपांतर झाले. हा संघर्ष शहरी भागात, विशेषत: दारफुर प्रदेशात विनाशकारी आहे आणि वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कार यासारख्या भयानक घटनांना जन्म देत आहे. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघटनांनी या घटनांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्हे म्हणून संबोधले आहे.
⚡️ A military plane crashed after takeoff from Wadi Sidna base in Omdurman, Sudan, killing three civilians.
The Sudanese army confirmed casualties among soldiers and civilians. pic.twitter.com/CmMyDfnkpL
— War Intel (@warintel4u) February 25, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nostradamus Prediction : नॉस्ट्राडेमसची ‘ही’ भविष्यवाणी आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीशी संबंधित
सुदानमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली आहे
अलिकडच्या काही महिन्यांत लष्कराने खार्तूम आणि इतर भागात आरएसएफविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. RSF, जे पश्चिम दारफुरच्या बहुतेक भागावर नियंत्रण ठेवते. त्यांनी दावा केला की त्यांनी सोमवारी (23 फेब्रुवारी) दक्षिण दारफुर प्रांताची राजधानी न्याला येथे सुदानी सैन्य विमान पाडले. अशा घटनांमुळे सुदानचे संकट आणखी गुंतागुंतीचे होत आहे आणि त्यामुळे नागरी सुरक्षा आणि शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.