Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या तीन दिवसांत अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये तीव्र बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे ६१ जणांचा बळी केला आहे. अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (ANDMA) याची पुष्टी केली आहे. तसेच यामध्ये ११० लोक जखमी झाल्याचे ANDMA सांगितले आहे.
ANDMA ने दिलेल्या माहितीनुसाप, काही भागांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अनेक लोकांची घरे कोसळली आहे. तसेच हिमस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कडाक्याची थंडी असून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करुन महिला आणि मुलांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य आणि उत्तरेकडील भागांमध्ये निसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत लोकांची घरे कोसळली आहेत. जोरदारे थंड वारे, आणि पावसामुळे लोकांच्या घरांचे छप्पर कोसळले आहे. यामुळे सहा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
तसेच राजधानी काबूलच्या उत्तरेकडील भागात सलांग महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच उझबेकिस्तानच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरे अंधरात बुडाली आहेत. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
दरम्यान तीव्र बर्फवृष्टीमुळे पर्वतीय भागांमध्ये बर्फाळ रस्त्यांमुळे अनेक प्रवाशी अडकले आहेत. तापमान अत्यंत कमी होत असून खाण्या-पिण्याची टंचाई देखील निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत अधिकाऱ्यांनी लोकांना अन्न व आवश्यक मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांना धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे. अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागतली आहे. परदेशी मदतीचा सततच्या तुटवड्यामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
Ans: अफगाणिस्तानमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच लोकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे,
Ans: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.






