'या' छोट्या आफ्रिकन देशाने ट्रम्पला दाखवला ठेंगा ; हद्दपार स्थलांतरितांना घेण्यास दिला नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nigeria rejects Trump deportee deal : अबूजा : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या चर्चेचा विषय बनत आहे. ट्रम्प यांचे बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे धोरण सध्या जास्तचं चर्चेत आहे. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांतील स्थलांतिरतांना देशातून हाकलेले आहे. या स्थलांतरितांना देशातून हद्दपार करुन आफ्रिकन देशांमध्ये पाठवले जात आहे. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयावर एका छोट्या आफ्रिकन देशाने संताप व्यक्त केला आहे.
आफ्रिकन देश नायजेरियाने (Nigeria) ट्रम्प यांच्या निर्णायला विरोध केला आहे. नायजेरियाने अवैध स्थलांतरितांना घेण्यास नकार दिला आहे. स्थानिक वृत्तंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नायजेरियाचे प्रवक्ते किम्बी अबिएन्फा यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. किम्बी अबिएन्फा यांनी म्हटले आहे की, पश्चिम आफ्रिकन राष्ट्र सध्या अनेक देशांतर्गत आव्हानांचा सामना करत आहे. यामुळे नायजेरिया अतिरिक्त भार स्वीकारु शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
इस्रायलच्या ‘गाझावर ताबा’ योजनेला ‘या’ मुस्लिम देशांनी केला विरोध; जाणून घ्या कोण काय म्हणाले?
नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, इतर देश काय करत आहे याची त्यांना पर्वा नाही, सध्या आम्ही अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. अशा परिस्थिती अतिरिक्त परदेशी भार स्वीकारणे आम्हास मान नाही. तसेच आमच्यावर कोणताही दबाव स्वीकारला जाणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. नायजेरियाने स्पष्ट केले आहे की, नायजेरिया एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि राष्ट्राच्या सुरक्षेवर होण्याऱ्या परिणामांचा पूर्णपणे विचार केल्यानंतरच आम्ही निर्णय घेतो.
नायजेरियाचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ट्रम्प स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी तातडीने कडक कारवाई करत आहे. तसेच आणखी एका देशासोबत अवैध नागरिकांना पाठवण्यासाठी करार करण्याचा प्रयत्न करत आहे.
याच वेळी ट्रम्प यांच्या प्रस्तावाला दक्षिण सुदाननेही नकार दिला आहे. ट्रम्प यानी दक्षिण सुदानवर स्थलांतरितांना देशाच्या तुरुंगात ठेवण्यासाठी करार करण्याचा आग्रह धरला होता. परंतु सुदाने ट्रम्प दबावाला न जुमानता त्यांचा प्रस्ताव अस्वीकार केला आहे. तसेच देशात अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
काय आहे अमेरिकेचे बेकायदेशीर स्थलांतर (Illegal immigration) धोरण?
डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातून अवैध नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत एन्ट्री केलेल्या लोकांवर कडक कारवाई करुन त्यांना बाहेर काढले जात आहे.
का सुरु करण्यात आले आहे धोरण?
ट्रम्प यांनी अमेरिकेत मानवी तस्करी रोखण्याच्या उद्देशाने आणि देशातील परदेशी लोकांची संख्या कमी करण्याच्या हेतूने हे धोरण राबवले आहे.
अमेरिकेने कोणत्या देशाच्या नागरिकांना केले हद्दपार?
अमेरिकेने भारतासह अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांसारख्या देशाली नागरिकांना अमेरिकेतून हद्दपार केले आहे.