मोरक्कोमध्ये भीषण दुर्घटना! दोन बहुमजली इमारती कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे कमकुवत बांधकाम आणि इमारत बांधकामाचे नियमांचे पालन न केल्याने हा अपघात घडाला आहे. गेल्या काही काळापासून इमारत अपघाताच्या घटनांमध्ये मोरोक्कोत प्रचंड वाढ झाली आहे. बिल्डर बांधकामाच्या मूलभूत आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे, तसेच सरकार देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेने संताप व्यक्त केला आहे. याविरोधात आधीच निदर्शने देखील सुरु आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच घडलेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या होन उमारतींमध्ये आठ कुटुंब वास्तव करत होती. या अपघातात १६ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावाचे आणि शोधाचे काम सुरु आहे. फेझ हे मोरोक्कोचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. या महिन्यात होणाऱ्या आफ्रिका ऑफ नेशन्सच आणि २०३० च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन या शहरात होणार आहे.
फेझ शहर हे तटबंदीच्या शहरासाठी, प्राचीन बाजारपेठांसाठी आणि चामड्याच्या कातड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती आहे. यामुळे गेल्या काही काळात इमारतींच्या कोसळण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मे २०२५ मध्ये एक इमारत कोसळली होती. १० लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ७ जण जखमी झाले होते. सध्या लोकांनी सरकारवर आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये असमानता, दुर्लक्षपणा केल्यामुळे लोक संतापले आहे. लोकांच्या मते सरकार सर्व पैसा नव्या स्टेडियमवर खर्च करुन सामान्य नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Ans: मोरोक्कोमध्ये फेझ शहरामध्ये दोन बहुमजली इमारती कोसळल्या आहेत.
Ans: मोरोक्कोमध्ये इमारत कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू आणि १६ जण जखमी झाले आहेत.
Ans: मोरोक्कोमध्ये फेझमध्ये झालेल्या इमारत अपघातामागे इमारतीचे कमकुवत बांधकाम, जुन्या आणि बहुमजली इमारती आहे.






