Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh block Shaikh Hasina’s Voter ID : ढाका : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. शेख हसीना (Shaikh Hasina) आता बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका लढवू शकणार नाहीत. कारण बांगलदेशच्या (Bangladesh) निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेखी हसीना यांचे मतदार ओळखपत्र ब्लॉक केले आहे. यामुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.
अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी निष्पक्षपणे निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी अनेक पक्षांनी नोंदही सुरु केला आहे. मात्र शेख हसीना यांच्या निवडणुक लढवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आले आहे. ढाकाच्या निवडणूक आयोगाने हसीना यांचे राष्ट्रीय ओळखपत्र ब्लॉक केल आहे. यामुळे हसीना यांना फेब्रुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान करता येणार नाही.
जर निवडणूक आयोगाने राष्ट्रीय ओळखपत्र ( NID) लॉक ब्लॉक केले तर संबंधित व्यक्ती परदेशातून मतदान करु शकत नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाचे सचिव अख्तर अहमद यांनी दिली आहे. त्यांनी निर्वाचन भवन येथील पत्रकार परिषदेदरम्यान अख्तर यांनी हसीना यांच नाव न घेता सांगितले की, निवडणूक आयोगाने हसीना यांचे NID ब्लॉक केले आहे. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे आयडी कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे. पण अद्याप शेख हसीना निवडणुक लढवू शकतील का नाही हे स्पष्ट झालेले नाही.
बांगलादेशाच्या निवडणूक आयोगाने काय घेतला निर्णय?
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (NID) ब्लॉक केले आहे.
शेख हसीना बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका लढवू शकणार नाहीत?
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने हसीना NID ब्लॉक केले आहे, यामुळे त्या मतदान करु शकणार नाहीत. पण त्या निवडणूका लढवू शकणार का नाहीत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतासाठी धोक्याची घंटा? बांगलादेश चीनकडून खरेदी करणार J-10 लढाऊ विमाने?