अमेरिकेत प्रवेश मिळणं झालं कठीण! डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय दाम्पत्य विमानतळावरुनच परत(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कठोर आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकतील अवैध घुसखोरी रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय, अमेरिकेतील परदेशी नागरिकांचे वास्तव कमी करण्यासाठी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा देखील कठोर करण्यात आला आहे. यामुळे अनेक परदेशी नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेषत: भारताच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. भारतीयांना अनेक अडचणींना समारो जावे लागत आहे. दरम्यान न्यूजर्सीच्या एअरपोर्टवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका भारतीय दाम्पत्याला अमेरिकेत एन्ट्री नाकारण्यात आली आहे.
2025 च्या अमेरिकेचे नवीन इमिग्रेशन धोरण
मिळालेल्या माहितीनुसार, B1/B2 व्हिसावर एक भारतीय जोडपे आपल्या मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. मात्र जोडप्याने रिटर्न तिकीट न दाखवल्याने त्यांची अमेरिकेत एन्ट्री रोखली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोडप्याला विमानतळावरुनच भारतात परतावं लागले आहे. 2025 च्या इमिग्रेशन धोरणांत झालेल्या बदलांचा हवाला देत अमेरिन अदिकाऱ्यांनी भारतीय जोडप्याला प्रवेश नाकारला आहे. या प्रकरणावर बोलताना अधिकाऱ्यांनी म्हटले की, “2025 च्या अमेरिकेच्या नवीन इमिग्रेशन धोरणांनुसार, B1/B2 व्हिसावर येणाऱ्या लोकांकडे परतीचे तिकीट असणे आवश्यक आहे.
प्रवासी गोंधळात
दरम्यान रिटर्न तिकीट आवश्यक असल्याचे माहित नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांनी याबाबत त्यांना कोणतीही पूर्वी कल्पना नसल्याचे सांगितले. यामुळे इतर परदेशी प्रवाशांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. हा नियम अचानक लागू करण्यात आला असून नियम अधिक कडक बनवले जाऊ शकतात. इमिग्रेशन धोरणांबाबत पूर्वसूचना न मिळाल्याने अनेक अडचणी वाढल्या आहे.
भारत सरकारने जारी केला सल्ला
याच दरम्यान भारताने इमिग्रेशन नियमांत बदल झाल्याने प्रवाशांना अतिरिक्त सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. सरकारने प्रवाशांना परतीचे तिकीट आणि प्रवास योजनेचा पुरावा अशी सर्व कागदपत्रे प्रवासादरम्यान सोबत ठेवण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय, नवीन नियमांबद्दल अधिकृत सरकारी वेबसाईट्स आणि ट्रॅव्हल एजंट्सचा सल्ला घेण्यासही सांगण्यात आले आहे.
भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
सध्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. एकूण 18 हजार भारतीयांना परत आणण्यात येणार असून या लोकांकडे अमेरिकेचे नागरिकत्वही नाही आणि त्यासाठी लागणारी योग्य कागदेपत्रे देखील उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.