बलुच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानच्या अनेक भागात भीषण हल्ले (फोटो -सोशल मिडिया)
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला समजला जातो. भारतात ज्या दहशतवादी कारवाया होत असतात त्या मागे पाकिस्तानचा हात असतो हे वारंवार सिद्ध झाले आहे, मात्र पाकिस्तान सध्या वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये अनेक मोठे भीषण हल्ले केले आहेत. याबाबत बलुच आर्मी लिबरेशनने एक प्रेस रिलीज केली आहे.
बलुचिस्तानच्या आठ जिल्ह्यांमध्ये झालेल्या दहा हिंसक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली बलुच आर्मी लिबरेशनने स्वीकारली आहे. बीएलएने दावा केला की या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी सैन्याला आयईडी स्फोटांनी लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांदरम्यान पोलिस आणि सुरक्षा दलांकडून शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. कथित ‘डेथ स्क्वॉड एजंट्स’ना देखील लक्ष्य करण्यात आले. बलुच सैनिकांच्या या हल्ल्यांमुळे या भागात तणाव वाढला आहे, तर पाकिस्तानी सुरक्षा दलांसमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत.
बलुचच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे की त्यांच्या हल्ल्यात ५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर १४ जखमी झाले. बीएलच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये तीन लष्करी वाहनेही नष्ट झाली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या महिन्यात बीएलएचे सैनिक पाकिस्तानी सैन्याविरुद्ध सतत मोहीम राबवत आहेत.
अखेर ट्रेन हायजॅकचा नाट्यपूर्ण थरार संपला
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जबाबदारी स्वीकारत असा दावा केला आहे की ट्रेनमध्ये 214 पाकिस्तानी सैनिकांसह एकूण 426 प्रवासी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत 60 सैनिक मारले गेले आहेत, तर 150 अजूनही ओलीस आहेत. तसेच बीएलएच्या ताब्यात 43 पंजाब रेजिमेंटशी संलग्न असलेला पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी कॅप्टन रिझवान आहे.
रेल्वे सेवा नुकतीच पूर्ववत करण्यात आली
दीड महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवल्यानंतर पाकिस्तान रेल्वेने क्वेटा ते पेशावर रेल्वे सेवा पूर्ववत केली होती. बीएलएने एक निवेदन जारी करून पाकिस्तानी लष्कराने कोणतीही कारवाई केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा दिला होता.
पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेने बंदी घातलेल्या या गटाच्या कारवाया अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. बलुचिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 62 जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वेने अनेक सेवा तात्पुरत्या बंद केल्या.
सशस्त्र दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल शरीफ यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवारी बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवानही शहीद झाले. लेफ्टनंट जनरल शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने प्रत्युत्तर देत सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली.