जग विनाशाच्या उंबरठ्यावर? रशिया-युक्रेननंतर आता 'या' दोन देशात युद्धाची ठिणगी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या जग तीन आघाड्यांवर युद्ध लढ आहे. एकीकडे रशिया-युक्रेन, दुसरीकडे इस्रायस विरोधी हमास आणि तिसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव.अशा परिस्थीत आणखी एक युद्धाची ठिणगी पडली आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. लष्करी संघर्ष सुरु होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (२८ मे) सकाळी सीमा भागात थाई आणि कंबोडियन सैनिकांमध्ये गोळीबार झाला. त्यावेळे पासून दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव निर्माण झाला आहे. कंबोडियाच्या सैन्याचे प्रवक्ते माओ फल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सैन्य सीमा भागात नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना थाई सैनिकांनी गोळीबार केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. २००८ पासून सुरु असलेला थायलंड आणि कंबोडियातील सीमा क्षेत्राबाबतचा वाद पुन्हा उफाळला आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये सुरु असलेला सीमावाद २००८ पासून सुरु आहे. हा वाद हजारो वर्ष जुन्या मंदिरामुळे सुरु झाला होता.
कंबोडियाच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्यानंतर थायलंडच्या लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात लष्कराने गोळीबाराचे स्पष्टी करण दिले आहे. लष्कराने म्हटले आहे की, कंबोडियन सैनिकांनी थायलंडच्या वादग्रस्त बागात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी थायलंडचे सैन्य वाटाघाटीसाठी पोहोचले होते. पण काही गैरसमज झाल्याने कंबोडियाने गोळीबार सुरु केला. याला थाई सैनिकांनी प्रत्युत्तर दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० मिनिटे थायलंड आणि कंबोडियाच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला. सध्या दोन्ही पक्षात चर्चा सुरु आहे. परंतु हा वाद आणखी उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंबोडियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारादरम्यान त्यांच्या एक जवान लढाईत शहीद झाला आहे. पण थायलंडच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.तसेच थायलंडचे संरक्षण मंत्री पुमथम वेचायचाई यांनी परिस्थीत निवळली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मोट्या संख्येने कंबोडियन सैनिक वादग्रस्त सीमा क्षेत्राकडे जाताना दिसत आहे. व्हिसेग्राड २४ या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार, थाई सैनिकांसोबत झालेल्या गोळीबारानंतर कंबोडिया सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले जात आहे.
BREAKING:
The Cambodian Army is pulling troops toward the border with Thailand after a Cambodian soldier was killed during a border clash with Thai soldiers this morning.
The border conflict in the area started in 2008 pic.twitter.com/iYy3pUfMhp
— Visegrád 24 (@visegrad24) May 28, 2025