Canada Visa : कॅनडा पण स्थलांतरितांना हाकलणार देशाबाहेर? ठेवणार डोनाल्ड ट्रम्पच्या पावलावर पाऊल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Canada Visa Rule Update : ओटावा : एक मोठी बातमी समोर येत आहे. आता कॅनडा (Canada) देखील आपल्या स्थलांतर धोरणांमध्ये मोठा आणि वादग्रस्त बदल करत आहे. यामुळे कॅनडामध्ये शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणाप्रमाणेचे कॅनडाचे धोरण असल्याचे म्हटले जात आहे. याचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे.
कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारने केलेल्या बदलावामुळे तात्पुरता निवासी व्हिसा रद्द (Temporary Resident Visa) होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सीबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाने इमिग्रेशन रेफ्यूजीज अँड सिटीझनशिप कॅनडा (IRCC) आणि कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सी (CBSA)कडे नवीन प्रस्ताव मांडला आहे.
या प्रस्ताव सांगण्यात आले आहे की, परदेशातून आलेल्या अर्जांमध्ये फसवणूक किंवा कोणत्या प्रकारचे गैर-वापराते पुरावे आढळले तर त्या देशातील सर्वा व्हिसा एकाच वेळी रद्द करता यावेत. सध्या प्रत्येक अर्जची तपासणी स्वतंत्रपणे केली जाते, परंतु या नव्या व्हिसा प्रस्तावामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे अनेक प्रामाणिक लोकांना याचा फटका बसेल.
गेल्या काही काळात कॅनडामध्ये निर्वासितांची संख्या वाढत आहे. २०२३ मध्ये केवळ भारतातून ५०० हून अधिक अर्ज आले आहेत. जे २०२४ पर्यंत वाढून २००० पर्यंत दर महिना झाले. मीडिया रिपोर्टनुसार, इमिग्रेशन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत, बांगलादेश आणि नायजेरियामधून काही अर्जांमध्ये बनावट कागपत्रे आणि खोटे दावे आढळले आहेत. यामुळे त्यांच्या सिस्टमवर मोठा ताण वाढला आहे. जगभरातून गेल्या वर्षी २० हजारांहून अधिक निर्वासित कॅनडामध्ये आले आहेत.
मार्क कार्नी सरकारचा हा प्रस्ताव मंजूर झाला, तर भारताच्या विद्यार्थी, पर्यटक आणि वर्क परमिट धारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे योग्य प्रक्रियेशिवाय मोठ्या प्रमाणात हद्दपारी होऊ शकते. यामुळे मानवी हक्क संघटनांनी कार्नी सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध केला आहे.
तसेच याला अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण म्हटले आहे. परंतु कार्नी सरकारने ही व्हिसा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पण सध्या यामुळे भारतीय नव्हे, तर कॅनडात राहणाऱ्या इतर परदेशींची चिंता देखील वाढली आहे.
Ans: कॅनडाने नवा प्रस्तावात म्हटले आहे की, परदेशातून आलेल्या अर्जांमध्ये फसवणूक किंवा कोणत्या प्रकारचे गैर-वापराते पुरावे आढळले तर त्या देशातील सर्वा व्हिसा एकाच वेळी रद्द करता यावेत.
Ans: कॅनडाच्या नव्या व्हिसा प्रस्तावामुळे भारताच्या विद्यार्थी, पर्यटक आणि वर्क परमिट धारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इतर परदेशींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.






