Car Buying Tips : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची? जाणून घ्या संपूर्ण गणित (फोटो सौजन्य: एआय)
हे देखील वाचा : PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार?
नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यावर पहिल्या २-३ वर्षात तिची बाजारातील किंमत झपाट्याने कमी होईल. यामुळे पहिल्या मालकासाठी हे तोट्याचे वाटेल, पण सेकंड हँड खरेदी करण्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
३ वर्षे जुनी ई-कार खरेदी केल्यास ती तुम्हाला मूळ किमतीपेक्षा अधिक स्वस्त मिळेल. यामुळे नवीन पेट्रोल कार घेण्याच्या बजेटमध्ये तुम्ही उत्तम फीचर्स असलेली ई-कार घेऊ शकतो.
पांरपारिक गाड्यांच्या तुलने इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन, गिअरबॉक्स, सायलेन्सर यांसारखे पार्ट्स नसतात. यामुळे तुम्हाला वेळोवेळी इंजिन बदलण्याची गरज नाही. तसेच सव्हिर्सिंगचा खर्चही ५० ते ६० टक्के कमी होईल. इंजिन बिघडाची शक्यात नसल्याने मेंटेन्सचा हजारो रुपयांचा खर्चही वाचेल.
याशिवाय इलेक्ट्रिक कारचा सर्वा मोठा यूएसपी म्हणजेच प्रति किलोमीटर येणारा खर्च आहे. तुम्ही कार घरी चार्ज करत असाल, तर पेट्रोलच्या तुलनेत प्रवासाचा खर्ज अगदी कमी येतो. पब्लिक फास्ट चार्जिंग स्टेशन वापरल्यास खर्च थोडा वाढू शकतो, पण पेट्रोल-डिझेलपेक्षा कितीतरी पटीने खर्च कमीच असेल.
सेकंड हँड ई-कार घेताना बॅटरीची हेल्थ तपासा. ईव्ही कारचा सर्वात महागडा भाग बॅटरीच असते. दर बॅटरीची कार्यक्षमता उत्तम असेल आणि कंपनीची वॉरंटी शिल्लक असेल तर ई-कार खरेदी करणे सर्वात फायदेशीर निर्णय ठरु शकतो.
हे देखील वाचा : TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ






