प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी! अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; इंडो-पॅसिफिकमध्ये चिंता वाढली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : ‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?
चीनच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपाणस्त्र अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून डागण्यास सक्षम आहे. तसेच चाचणीत अण्वस्त्राऐवजी डमी वॉरहेडचता वापर करण्यात आला आहे. क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूकतेने गाठल्याचा दावा चीनने केला आहे.
दरम्यान चीननेच्या या चाचणीवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने तीव्र विरोध केला आहे. न्यूझीलंडने सांगितले की, या चाचणीची माहिती काही तास आधीच देण्यात आली. ही चाचणी दक्षिण प्रशांत महासागरातील अण्वस्त्रमुक्त क्षेत्रात झाल्याने न्यूझीलंडने चिंता व्यक्त केली आहे
तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांनी या चाचण्यांच्या लष्करी हालचालींमुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. चीनने आपल्या कारवायांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान चीनने या सर्व चिंता फेटाळून लावल्या आहेत. संबंधित देशांना चाचणीपूची पूर्वकल्पना दिली होती. कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, हा केवळ एक लष्करी सारावाचा भाग होता असे चीनने स्पष्ट केले आहे.
परंतु ऑस्ट्रेलिया-फिजीतील संरक्षण करारानंतर काही तासांतच ही चाचणी झाल्याने याकडे लष्करी सराव म्हणून नाही तर धोका म्हणून पाहिले जात आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे लागले आहे.
Breaking news: The launch of an intercontinental ballistic missile in the Pacific Ocean was the first of its kind in almost two years, raising concerns.https://t.co/w5zEgn6Tjp — The New York Times (@nytimes) July 6, 2026
हे देखील वाचा : Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी






