'आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत' ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फॉक्स न्यजूला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहूंना जेडी व्हॅन्स यांनी केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी नेतन्याहूंनी भारतासारखे अनेक विश्वासू मित्र इस्रायलकडे असल्याचे म्हटले. त्यांनी भारतातील १४० करोटी लोकांपैकी अनेकजण इस्रायलला पाठिंबा देतात असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी जेडी व्हॅन्स यांच्यासोबत कोणतेही वैयक्तिक मतभेद नसल्याचेही स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, काही मतांशी मी सहमत नाही, एवढेच.
तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचेही नेतन्याहूंनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसात इराणविरोधातील सघर्षावरुन ट्रम्प आणि नेतन्याहूंनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद वाढल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ट्रम्प यांनी नेतन्याहूंवर टीकाही केली होती.
ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. मात्र, इस्रायलकडून लेबनॉनवरील कारवाया सुरुच होत्या. यावरुन जेडी व्हेन्स यांनी इस्रायलवर टीका केली होती. अमेरिकेच्या शस्त्रांचा वापर करुन इस्रायल अशांतात निर्माण करत आहे असे त्यांनी म्हटले होते.
यावर उत्तर देताना नेतन्याहूंनी लेबनॉनवरील हल्ले कबूल केले. हिजबुल्लाहपासून लेबनॉनच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कारवाया त्यांचे सैन्य करत असल्याचा हवाला नेतन्याहूंनी दिला.
सध्या येत्या आठवड्यात ट्रम्प-नेतन्याहू यांच्या भेटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये ही भेट होणार असून यामध्ये मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि इस्रायल-अमेरिका संबंधावर चर्चा होईल असे सांगितले जात आहे.
#BREAKING: Prime Minister of Israel Netanyahu reacting to recent comments of US Vice President JD Vance says he gets a lot of support from 1.4 billion people of India. Vance had earlier claimed that the U.S. is the last country that still supports Israel. @netanyahu @IsraeliPM pic.twitter.com/O7tJPa1iJI — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 5, 2026






