Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
कीव्ह सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (०६ जुलै) पहाटे आणि रविवारी (०५ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास रशियन सैन्याने कीव्हला लक्ष्य केले. कीव्हमधील रहिवाशी इमारतींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे अनेक भागांमध्ये भीषण आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे.
सध्या बचाव कार्य सुरु असून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे. युक्रेन लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसाप, कीव्हच्या पोडिल्स्की जिल्ह्यात एक रहिवाशी इमारती पूर्णपणे ढासालळी आहे. तर डार्नित्सिया जिल्ह्यात अनेक बहुमजली इमारतींना मोठे नुकसान झाले आहे.
सरकारकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांदरम्यान संपूर्ण शहरात सायरन आणि स्फोटांचेही आवाज ऐकू येत होते. यामुळे सामान्य नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित बंकरमध्ये धाव घेतली.
Russia launched high-precision, long-range strikes on military industrial enterprises in Kiev, Poltava, Cherkаssy, Chernigov & Dnepropetrovsk — Russian MoD pic.twitter.com/MmUrBeEDe5 — RT (@RT_com) July 6, 2026
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याआधीच रशियाकडून मोठ्या हल्ल्याची शंका व्यक्त केली होती. त्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला. झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पश्चिम आशियातील सहकारी देशांकडे युक्रेनची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी पॅट्रियट क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, सुरक्षा संसाधनांच्या कमतेरतेमुळे युक्रेनला रशियाचे हल्ले रोखण्यास अडथळे येत आहेत. तसेच रशियाला हे युद्ध संपवायचे नसल्याचे या हल्ल्यांवरुन स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले.






