फोटो सौजन्य AI
अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांच्या मते, चीनच्या वाढत्या शक्तीला तोंड देण्यासाठी एका व्यापक आघाडीची गरज आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका एकटा चीनचा सामना करू शकणार नाही, कारण चीन एक प्रचंड मोठा देश आहे आणि त्याची बाजारपेठही विशाल आहे. पुढे ते असेही म्हणाले की, जर अमेरिकेने भारत, युरोप, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबत मिळून काम केले, तर परिस्थिती वेगळी असू शकते. अमेरिका आणि भारत मिळून जागतिक अर्थव्यवस्थेत ५० ते ६० टक्के वाटा उचलतात. ही आघाडी निश्चितपणे चीनला रोखू शकते.
चीनबद्दलच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अँटोनी ब्लिंकन म्हणाले, “बीजिंगसोबतचे आमचे संबंध सर्वात कठीण आहेत. त्यात संघर्ष आणि सहकार्य असे दोन्ही पैलू आहेत. आम्हाला त्यांच्यासोबत संघर्ष टाळायचा आहे, कारण ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. चीनची लोकसंख्या यामुळे चीनची बाजारपेठ आमच्यापेक्षा मोठी आहे, त्यांनी घेतलेल्या उत्पादन क्षमतेच्या मेहनतीवर आज त्यांचा देश आज आमच्या पेक्षा जास्त उत्पादन निर्माण करण्याची क्षमता ठेवतो , त्यांच्याकडे अधिक जहाजे आहेत आणि ते अधिक शोधनिबंध व पेटंट्स तयार करतात. कारण त्यांनी आधी शिक्षणाला महत्व दिले , त्याची गुणवत्ता वाढवली , त्यामुळे आपण कितीही बलवान आणि शक्तिशाली असलो तरी, त्यांच्याशी थेट स्पर्धा करणे कठीण आहे.
अँटोनी ब्लिंकन यांनी जो बायडेन यांच्या कार्यकाळात (२०२१ ते २०२५) अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले. अमेरिकेच्या अग्रगण्य राजनैतिक अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाणारे ब्लिंकन म्हणाले, अनेक ठिकाणी आणि अनेक मार्गांनी वॉशिंग्टनला मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याचे आपण पाहत आहोत. अमेरिकेला आता जगात एक विश्वासार्ह नेता म्हणून पाहिले जात नाही. याला ट्रम्प यांच्या सरकारचे बरेचसे निर्णय कारणीभूत आहेत .
ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका आता असा देश राहिलेला नाही, ज्याच्यासोबत इतर देशांना काम करायचे आहे किंवा ज्याचे अनुकरण करायचे आहे. सर्वेक्षणांनुसार चीनला अधिक विश्वासार्ह आणि भरवसापात्र मानले जाते. जर्मनीसारखे देश अमेरिकेला आपला प्रतिस्पर्धी मानत आहेत. युरोप, कोरिया, जपान आणि इतर ठिकाणीही अमेरिकेला विरोध दिसून येत आहे.
चीनी पत्रकार आणि तज्ज्ञ पॅट्रिक झेंग यांनी अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, बऱ्याच काळापासून चीनला कमी लेखण्याची पद्धत सुरु होती , पण आता अमेरिकन लोक हे ओळखत आहेत की चीन एक खूप मोठी शक्ती बनला आहे. वॉशिंग्टनमधील लोकांना हे कळत आहे की चीनशी थेट संघर्ष करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
पॅट्रिक यांनी लिहिले, हा चीनी प्रचार नाही. ही चीनच्या उत्पादन, औद्योगिक क्षमता, नवोपक्रम आणि नौदल शक्तीच्या खऱ्या पातळीची वॉशिंग्टनने दिलेली थेट मान्यता आहे. चीनने गुंतवणूक, दीर्घकालीन नियोजन आणि उत्पादक शक्तींच्या माध्यमातून हे स्थान मिळवले आहे . या प्रगतीमध्ये सरकारी मार्गदर्शन आणि बाजारपेठेतील गती यांचा योग्य मेळ चिनी सरकाने घातला आहे.






