Bangladesh Plane Crash : विमान अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ; बांगलादेशात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एक मोठा विमान अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ढाकामध्ये बांगलादेशच्या एअरफोर्सचे F7 एअरक्राफ्ट उत्तरी भागात असलेल्या एका शाळेच्या परिसरात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातानंतर संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरले आहे. सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शाळेत शेकडो विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेतले होते. या अपघातात आतापर्यं २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १७० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येथ आहे. सध्या जखमींवर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. निवासी सर्जन शॉन बॉन रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील दोघांचा प्लॅस्टिक सर्जरी संस्थेत मृत्यू झाला आहे.
चीनच्या F-7 BGI या जेट विमानाने कुरमिटोला हवाई तळावरुन प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते. दरम्यान उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडमुळे भीषण अपघात झाला. पायलटने विमान वस्तीपासून दूर नेण्याचा अखेरचा प्रयत्न केला, मात्र विमान शाळेच्या दोन मजली इमारतीवर कोसळले.
अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमाना भीषण आग लागल आणि शाळेच्या संपूर्ण आवारत काळा धूर पसरला होता. यावेळी अनेक विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी तडफड करताना, पळताना दिसले.
सध्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढाकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, सध्या ७ रुग्णालयांमध्ये ८८ जखमींवर उपचार सुरु आहे. यातील २५ जणांची परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत १७ मृतदेह अपघातातून काढण्यात आले आहे. यामध १० मुलांचा समावेश आहे. तसेच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
बांगलादेशच्या हवाई दलाचे हे विमान मल्टीरोल फायटर जेट चीनी बनावटीचे आहेत. चीनच्या j-7 लढाऊ विमानांते हे प्रगत अत्याधुनिक विमान आहे. हे विमान सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ च्या काळात बनवण्यात आले होते. २०११ मध्ये बांगलादेशाने याची खरेदी केली होती.