Hormuz Toll : ट्रम्प यांची मोठा यु-टर्न! होर्मुझमध्ये टोल वसुली रद्द; आखाती देशांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War : युद्ध चिघळले! अमेरिकेच्या नव्या कारवाईनंतर इराण आक्रमक; खाडी देशांमध्ये तणाव शिगेला
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, आखाती देशांच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टोल आकारण्याऐवजी आखाती देश अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले. या नव्या व्यापार आणि गुंतवणूक करारामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, आखाती देशांकडून अमेरिकेत कारखाने, उद्योग, आणि उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे देशाच्या रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. यापूर्वी झालेल्या गुंतवणूकीपेक्षाही मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांनी होर्मुझवर टोल वसूल करण्याची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या निर्णयावर अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते. होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या कक्षेत येते. यामुळे कोणताही देश या मार्गावरुन एकतर्फी टोल लावू शकत नाही असे तज्ज्ञांनी म्हटले.
सध्या ट्रम्प यांनी इराणविरोधी टोलचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु इराणविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. इराणच्या बंदराकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या जहाजंची नाकेबंदी सुरुच राहिल असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे इराणने ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका करत अमेरिका होर्मुझवर नियंत्रण ठेवू शकत नाही असे म्हटले.
याच वेळी दुसरीकडे अमेरिकेची इराणविरोधात कारवाई सुरुच आहे. नुकतेच अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले असून याला प्रत्युत्तरदाखल इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले आहे. स्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जॉर्डन, बहरीन, आणि कुवैतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.






