डोनाल्ड ट्रम्पला आवडला नाही जेफ्रीच्या "मैत्रीचा हात" ; संताप व्यक्त करताच हटवले वॉशिंग्टनमधील पुतळे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump and Jeffrey Epstein : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव पुन्हा एकदा जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी जोडण्यात आले आहे.घडलं असे की अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी येथे एक १२ फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे.या मूर्तीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. कारण ही मूर्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून डोनाल्ड ट्रम्प आणि लैगिक अत्याचाराशी संबंध असलेला गुन्हेगार जेफ्री एपस्टिनची होती. आता ही मूर्ती हटवण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.
‘द सिक्रेट हँडशेक प्रोजेक्ट नावाच्या एका गटाने हे पुतळे वॉशिंग्टनमध्ये नॅशनल मॉलच्या बाहेर लावले होते. यामध्ये जेफ्रीन एपस्टिन आणि डोना्ल्ड ट्रम्प हातात हात धरुन होते. या मुतळ्याच्या खाली Best Friends Forever असे लिहिण्यात आले होते. या पुतळ्यामुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला होता.
ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? एलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या
ही मूर्ती हटवण्यात आली आहे. पण यामुळे राजकीय वाद रंगला होता. गेल्या काही काळात लैंगिक प्रकरणातील गु्न्हेगार जेफ्री एपस्टिनसोबत ट्र्रम्प यांच्या मैत्रीमुळे अनेक वाद रंगले आहे. ट्रम्प यांच्यावरही लैंगिक प्रकरणात सामील असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवया ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची भेट एपस्टिन घडवनू आणली असल्याचाही आरोप करण्यात आला होता. हा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलाने केला होता.
पण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने अनेकवेळा हे आरोप फेटाळले आहेत. तसेच व्हाइट हाऊसने देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टिनशी कोणतेही संबंध नसल्याचे अनेक वेळा सांगितले आहे. व्हाइट हाउसने सांगितले होते की, ट्रम्प यांनी जेफ्रीला त्यांच्या गैरवर्तणूकीमुळे काढून टाकले होते. त्यांच्या असलेले संबंध तोडले होते.परंतु पुतळ्यावरुन पुन्हा एकदा ट्रम्प आणि एपस्टिन वाद रंगला आहे. यामुळे अमेरिकेचे राजकीय वातावरण तापले आहे.
A huge statue, around 12-15 foot tall appeared at the National Mall today: In Honor of Friendship Month “In honor of friendship month. We Celebrate the long-lasting bond between president Donald J Trump and his “closest friend,” Jeffrey Epstein.” pic.twitter.com/OwqH6Ika9F — vamp.exe (@vampdotexe) September 23, 2025
श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी हे प्रकरण संबंधित आहे. जेफ्री एपस्टिनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा आरोप आहे. अमेरिकन-ऑस्ट्रेलियन महिला व्हर्जिनिया लुईस ग्रिफे हिने याबद्दल २०१९ मध्ये खुलासा केला होता. या प्रकरणामध्ये अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता.
FAQs(संबंधित प्रश्न)
ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाऊनची मुर्ती कुठे बसवण्यात आली होती?
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीतील नॅशनल मॉल बाहेर जेफ्री एपस्टिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची हातात हात घालून असलेली मूर्ती बसवण्यात आली होती.
कोणी बसवली होती ट्रम्प-एपस्टिन मूर्ती?
“द सिक्रेट हँडशेक प्रोजेक्टच्या” गटाने ट्रम्प आणि एपस्टिनची मूर्ती वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉल बाहेर बसवली होती.
कोण आहे जेफ्री एपस्टिनी ?
जेफ्री एपस्टिन हा श्रीमंत उद्योजक आहे, ज्याच्यावर अअल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काय आहे एपस्टिनचा संबंध?
जेफ्री एपस्टिन हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचा सहकारी आणि मित्र मानला जात होता. मीडिया रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी संबंध असल्याचे अनेकांनी आरोप केले आहे. पण हे आरोप ट्रम्प यांनी फेटाळले आहेत.
PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत