'भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र...' ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Peter Navarro on India Russia oil Trade : वॉशिंग्टन : सध्या भारत आणि अमेरिकेचे व्यापार संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे नाराज आहेत. याच वेळी ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी देखील भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारताच्या चीन आणि रशियाशी वाढत्या संबंधामुळे जगाला धोका निर्माण झाल्याचाही इशारा नवारो यांनी दिला आहे. दरम्यांन त्यांनी भारतावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पीटर नवारो यांनी म्हटले आहे की, भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करुन नफा कमवत आहे. मात्र याचा तोटा सामान्य भारतीयांना भोगावा लागत आहे. नवारो यांच्या म्हणण्यानुसार, रशियाकडून तेल खरेदीचा फायदा केवळ देशातील ब्राह्मणांना होत आहे. रशियाकडून तेल स्वत दरात खरेदी करतो. नंतर त्याच्या शुद्ध तेलात रुपांतर करतो आणि देशातील सामान्य लोकांना महाग विकतो. यामुळे रशियाला देखील युद्धासाठी आर्थिक मदत मिळत आहे. नवारो यांनी भारत
नवारो यांनी बारताला रशियाचे वॉशिंग मशीन म्हटले आहे. यामुळे भारत व्यापारामध्ये असंतुलन वाढवत आहे. तसेच चीन आणि रशियासोबतची मैत्री देखील जगासाठी धोकादायक ठरत आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO
नवारो यांच्या व्यक्तदव्यामुळे मात्र भारतीय राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. याच वेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांनी म्हटले की, पीटर नवारो यांचे आरोप निराधार आणि संबंध बिघडवणारे आहेत.
याशिवाय तृणमूलचे खासदार सागरिका घोष यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत नवारो यांचे विधान दिशाभूल करणारे असल्याचे
म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, ब्राम्हण हा शब्द पाश्चत्य देशात श्रीमंत लोकांसाठी वापरला जातो. यामुळे नवारो यांचे विधान हे दिशाभूल करणारे आहे आणि त्यांचे अज्ञान दर्शवणारे असल्याचे घोष यांनी म्हटले आहे.
This latest jibe from Navarro – that “Brahmins are profiteering” from Russian oil – tells us a lot about who controls narratives about India and Hindus inside the policy/intellectual spaces of America. This is derived directly from 19th century colonial jibes going back to the…
— Sanjeev Sanyal (@sanjeevsanyal) September 1, 2025
दरम्यान यापूर्वी देखील पीटर नवारो यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरुन गंभीर आरोप केले आहेत. नवारो यांनी युक्रेन युद्धाला मोदी वॉर म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवत नाही तोपर्यंत अमेरिका भारतावरील कर कमी करणार नाही. पीटर नवारो हे ट्रम्प यांच्या जवळचे आणि विश्वासून सल्लागार मानले जातता. त्यांच्या सल्ल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्या या विधानाने भारत आणि अमेरिका संबंधामध्ये आणखी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.