'पाकिस्तानची भाषा बोलू नका...', तुर्कीवर का संतापला भारत? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अंकारा: तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेले समर्थन केले आहे, यामुळे भारताचा रोष वाढला आहे. भारताने याबाबत तुर्कीला स्पष्ट शब्दात सुनावले आहे की, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि त्याचे आंतरराष्ट्रीयकरण होणार नाही. अलीकडेच एर्दोगान यांनी पाकिस्तान भेटीत काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली आहे.
एर्दोगान यांची पाकिस्तानला भेट
इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार काश्मीर मुद्दा सोडवावा, असे म्हटले. तसेच त्यांनी काश्मिरी जनतेच्या अपेक्षांचा विचार होणे गरजेचे असल्याचेही म्हटले. याचवेळी पाकिस्तान तुर्कीचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करत होता.
भारताची प्रतिक्रिया
भारताने यावर प्रतिक्रिया देत तुर्कीला पाकिस्तानसारख्या भूमिकेतून बोलणे थांबवावे, असे ठणकावून सांगितले आहे. भारताने नेहमीच काश्मीर आणि लडाख या भागांना आपल्या सार्वभौमत्वाचा भाग मानले आहे. यामुळे कोणत्याही तिसऱ्या देशाने या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असा भारताचा विचार आहे. यापूर्वीही एर्दोगन यांच्या वक्तव्यांवर भारताने नाराजी व्यक्त केली होती.
भारत तुर्कीवर नाराज का?
तज्ञांच्या मते, एर्दोगान यांनी यापूर्वी देखील काही काळासाठी काश्मीर मुद्द्यावर शांतता राखली होती. त्यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारिक संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला होता. तसेच ब्रिक्समध्ये सहभागी होण्याची इच्छा भारताकडे व्यक्त केली होता. मात्र, ब्रिक्समधील गरज संपल्यानंतर त्यांनी पुन्हा काश्मीरबाबत आपली भुमिका परत मांडली आहे. यामुळे त्यांच्या या कृतीवर भारतानं संताप व्यक्त केला आहे.
भारत-तुर्की संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता?
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी भारताचे ब्रिक्समध्ये केलेले समर्थन विसरून पाकिस्तानला पाठिंबा देणारे वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची ही भूमिका त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असेही काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. याप्रकारच्या वक्तव्यांमुळे भारत-तुर्की संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो. एकूणच, तुर्कीला भारताच्या स्पष्ट भूमिकेची कल्पना देऊन काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप थांबवावा लागेल, अन्यथा त्याचे परिणाम संबंधांवर होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटून गेली आहेत, मात्र भारत-पाकिस्तानमधील काश्मीर वाद आजही काय आहे. यापूर्वीही यावर आतंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वाद-विवाद झाले आहेत. यामुळे तुर्कीचा पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यात हस्तक्षेपामुळे तणाव भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढवत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला; तीन बसेसमध्ये मोठा स्फोट






