तैवानमध्ये पुन्हा भूकंप, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद, महिन्यात तिसऱ्यांदा बसलाय भूकंपाचा धक्का!

तैवानमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  पुन्हा एकदा तैवानमध्ये पृथ्वी तैवानमध्ये (earthquake in taiwan) हादरली. रात्री उशिरा येथे पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. एप्रिल महिन्यात तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही तिसरी वेळ आहे. भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी वर्तवण्यात आली आहे. भूकंपामुळे अनेक इमारती हादरल्या आहेत. परिसरात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने येथील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत.

  राजधानी तैपेईमध्ये इमारतीला हादरे

  बेटाच्या हवामान प्रशासनाने सांगितले की, शनिवारी तैवानच्या पूर्वेकडील काउंटी हुआलियनमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी किंवा इतर कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. भूकंपाच्या वेळी राजधानी तैपेईतील अनेक इमारती हादरल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान प्रशासनाने सांगितले की भूकंपाची खोली 24.9 किमी किंवा 15.5 मैल होती.

  तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर राजधानी तैपेईमधील हजारो लोक घराबाहेर पडले आणि मैदानी प्रदेशाकडे धावले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक लहान-मोठ्या दुकानांचे छत तसेच घरांमध्ये बांधलेले टिनाचे शेड उडून गेले. काही घरांमध्ये भिंतींवर लावलेली घड्याळेही पडली.

  महिन्याभरात तीनदा जाणवले भूकंपाचे धक्के

  तैवानमध्ये भूकंपाच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाच्या चिंतेसोबतच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही 3 आणि 23 एप्रिलला भूकंप झाला होता. यामध्ये काही जीवही गेले. एकाच महिन्यात तीन भूकंप झाल्याने अनेक लोक या भागातून पळ काढत आहेत.