Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका रिक्षात दहशतवाद्यांनी काही स्फोटके ठेवली होती. रिक्षा वर्दळी ठिकाणी उभी असताना अचानक मोठा बॉम्ब स्फोट (Bomb Blast) झाला आणि मोठा गोंधळ उडाला. या स्फोटात आसपासची दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून दृश्यांमध्ये विध्वंसाचे भयावह दृश्य पाहायला मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. आदिल जान आणि राहतुल्लाह अशी यांची ओळख असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या स्फोटामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी पेशावर आणि बन्नू जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) खान यांनी रुग्णांची विचारपूस केली असून त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदतीचे आदेश दिले आहेत.
या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश दिले असून दहशतवादाला मुळापासून उखडण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
गेल्या काही काळात खैबर पख्तूनख्वात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच बन्नू जिल्ह्यात एका पोलिस चौकीवर आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये १५ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या सततच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा सुव्यस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
A few minutes ago: At least 9 killed, over 20 wounded, including two police officers, have been killed in a blast at a market in Lakki Marwat, northwest Pakistan. pic.twitter.com/iFRBiwA3Xm — Weather Monitor (@WeatherMonitors) May 12, 2026
Ans: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील लक्की मारवत जिल्ह्यात भीषण स्फोट घडला आहे.
Ans: पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा बॉम्ब स्फोटात 9 जणांचा दुर्दैवी बळी गेला असून ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.






