एलॉन मस्कच्या मंगळ मोहीमेला मोठा झटका; स्टारशीप चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या केंद्रावर भीषण स्फोट, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Elon Musk SpaceX Explosion: एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला मोठा झटका बसला आहे. एका स्टारशीप चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या केंद्रावर भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अवकाशात ज्वालामुखीसारख्या उंच आगीच्या भडका उडाल्याचे दिसून आहे. हवेत राखेचे ढग परसलेले दिसून आले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जहाज ३६ च्या अग्नि चाचणीदरम्यान हा स्फोट घडल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी देखील स्पेसएक्सच्या स्टारशिप बेसवर अनेकवेळा स्फोट घडले आहे. स्पेसएक्सच्या टेक्सास शहरातील स्टारशिप बेसवर हा भीषण स्फोट घडला. यामुळे स्पेसएक्सलाच्या स्टारशिप लॉंचिंगला मोठा धक्का बसला आहे. अद्याप या स्फोटात कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीची माहिती मिळालेली नाही.
प्राथमिक तपासात रॉटेटच्या इंजिनने पट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या याची चौकशी सुरु आहे. परंतु यामुळे स्पेसएक्सच्या प्रोटोटाइपचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे स्टारशिपचे लॉन्चिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
ANOMALY! Just before Ship 36 was set to Static Fire, it blew up at SpaceX Masseys!
Live on X and YT:https://t.co/GPjZIX1Zyd pic.twitter.com/CfZhDeSGae
— NSF – NASASpaceflight.com (@NASASpaceflight) June 19, 2025
स्पेसएक्सची स्टारशिप ही एलॉन मस्क यांच्या महत्त्वपूर्ण अंतराळ मोहीमेसाठी होती. हे स्टारशिप मंगळावर पाठवण्यात येणार होते. परंतु या स्फोटामुळे सध्या स्पेसएक्स अडचणीत आला आहे. स्पेसएक्सने स्टारशिप प्रोग्राम काही काळासाठी रद्द केला आहे. एका मुलाखतीदरम्यान एलॉन मस्क यांनी स्पेसएक्स चे भविष्यातील लक्ष्य आणि योजनांबद्दल सांगतिले होते. त्यांनी अंतराळवीरांना मंगळावर नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी हे स्टारशिप लॉन्चिंग सुरु होते.
मस्क यांना भविष्यात मंगळावर मानवी वसाहत स्थापन करायची होती. त्यांच्या मते मानवी अस्तित्वासाठी याची गरज आहे. सध्या पृथ्वीवरील नैसर्गिक संकटांमध्ये वाढ होत आहे. तसेच नैसर्गिक संसाधने देखील मर्यादित पडत आहेत. अशा परिस्थिती मानवी जीवनसाठी पर्यायी ग्रह शोधण्याची मोहीमेची घोषणा एलॉन मस्क यांनी केली होती. परंतु या मोहीमेत गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडथले निर्माण होत आहे. हा स्पेसएक्सच्या स्टारशिपचा तिसरा स्फोट आहे. यामुळी ही मोहीम काही काळासाठी रद्द केली जात आहे.