युद्धावरुन अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला झापलं (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. 22 एप्रिल रोजी भारताच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात भारताकडून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र पाकिस्तानच्या एकाही सामान्य नागरिकांना मारण्यात आलेले नाही. मात्र तरीही भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरु झाले. यानंतर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला झापले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने कराची बंदर उद्धवस्त केले आहे. तसेच पाकिस्तानची राजधानी असलेले इस्लामाबाद देखील हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तान पूर्णपणे घाबरुन गेला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना अटक केल्याचे देखील बोलले जात आहे. भारताच्या सीमा भागांमध्ये पाकिस्तानने 50 हून अधिक ड्रोन हल्ले केल्यानंतर देखील पाकिस्तानने याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. यानंतर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानवर टीका केली असून पीडित असल्याचा कांगावा करणे बंद करा अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऑफिशियल ट्वीटर (एक्स) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये डझनभर भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताला प्रत्युत्तर देण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार होता. पाकिस्तानला पीडित असल्याचा कांगावा करुन नये. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही देशाला परवानगी मिळत नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. तसेच भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.
Terrorists launched an attack that killed dozens of Indian citizens. India had every right to retaliate and defend itself.
Pakistan does not get to play the victim. No country gets a pass for supporting terrorist activity.
— Nikki Haley (@NikkiHaley) May 8, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी कारवायामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई होती. मात्र पाकिस्तानने याचे प्रत्युत्तर म्हणून भारताच्या सीमा भागांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव कमी करणं हे पाकिस्तानच्या हाती आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानला सुनावलं. ‘द रेझिस्टन्स फोर्स’ या दहशतवादी संघटनेनं दोन वेळा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून या संघटनेचं नाव हटविण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केल्याचं मिस्री यांनी अधोरेखित केलं. दरम्यान दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयम बाळगण्याचं आवाहन इतर देशांकडून केलं जात आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात जागतिक प्रयत्न सुरू असल्याचा दावा पाकिस्तानी संरक्षणमंत्री असिफ यांनी केला.