इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय संतापाचा भडका; भारतासमोरील सुरक्षा आव्हान वाढले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यांच्या विरोधात जागतिक स्तरावर संतापाचा भडका उडाल्याचे दिसत आहे. या संतापाचे पडसाद आता भारताच्या शेजारील देशांपर्यंत पोहोचले असून, या परिसरात सुरू झालेल्या तीव्र निदर्शनांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील धोका वाढला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हजारो निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक देश, मानवतावादी संघटना आणि मुस्लिमबहुल राष्ट्रांमध्ये इस्रायलविरुद्ध आक्रमक भावना उफाळून आल्या आहेत.
या आठवड्यात बांगलादेश, मालदीव आणि पाकिस्तानमध्ये इस्रायलविरुद्ध तीव्र निदर्शने पाहायला मिळाली. या निदर्शनांमध्ये इस्रायलविरोधी घोषणांबरोबरच भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या, ज्यामुळे भारतातील अंतर्गत शांततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मालदीव सरकारने इस्रायली नागरिकांना देशात प्रवेश नाकारणारा कायदा मंजूर केला. राष्ट्रपती मोहम्मद मुइझो यांनी मंगळवारी या कायद्यावर स्वाक्षरी केली. त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही कारवाई इस्रायलच्या पॅलेस्टिनी जनतेविरुद्ध केलेल्या अत्याचारांना ठोस प्रत्युत्तर आहे.” बांगलादेश सरकारनेही आपल्या पासपोर्टवर “इस्रायल वगळता सर्व देशांमध्ये वैध” असे लिहिण्याचा निर्णय पुन्हा लागू केला. हे पाऊल देशाच्या इस्रायलविरोधी भूमिकेला अधोरेखित करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Afghanistan earthquake 2025 : अफगाणिस्तानात 5.6 तीव्रतेचा भूकंप; दिल्लीसह उत्तर भारतातही जाणवले हादरे
Maldives bans Israelis from entering country, in protest against Gaza’s ‘ongoing genocide’
The ban was done in ‘resolute solidarity with Palestinians’ and also applies to dual citizenshttps://t.co/ohul0iykLX— Kay Black (@BlackIsR3d) April 15, 2025
credit : social media
पाकिस्तानमध्ये इस्रायलविरोधी निदर्शने अधिक आक्रमक स्वरूपात झाली. निदर्शकांनी पाकिस्तान लष्कराला गाझा येथे हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले, तसेच अनेक ठिकाणी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांच्या दुकानांवर हल्ले आणि तोडफोड करण्यात आली. या प्रकारांमुळे संपूर्ण परिसरात अस्थिरता पसरली आहे.
या निदर्शनांच्या काळात अनेक कट्टरपंथी संघटनांनी “खिलाफत” पुनर्स्थापनेचा नारा दिला, ज्यामध्ये भारताचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. हे संकेत भारतासाठी धोक्याचे समजले जात असून, या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुरक्षेच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमांवर आणि अंतर्गत सुरक्षेवर दडपण वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलविरोधी आंदोलनांच्या नावाखाली कट्टरपंथी गट भारतातही सक्रिय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर इस्रायल विरोधात पसरवल्या जाणाऱ्या प्रचारामुळे देशात ध्रुवीकरण आणि तणाव निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
Pakistan stands with Palestine ❤️
Massive demonstrators come out in support of Palestinians in #Karachi, Pakistan in one call of #JUI.@MoulanaOfficial #طوفان_الاقصٰی_سندھ_امن_کانفرنس | #Gaza | #Gaza_Genocide | #طوفان_الاقص pic.twitter.com/yZAtpXmDOq
— Top Notch Journal (@topnotchjournal) November 2, 2023
credit : social media
भारताच्या गुप्तचर संस्थांनीही या परिस्थितीचा गांभीर्याने विचार सुरू केला असून, सीमेवर तसेच मोठ्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सामाजिक सलोखा राखण्याचे निर्देश दिले आहेत आणि अशा आंदोलनांचा गैरवापर होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Weather In India-Pakistan: भारत-पाकिस्तानमध्ये उष्णतेचा कहर; ‘डेथ व्हॅली’सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
गाझामधील संघर्षाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर स्पष्ट परिणाम होत आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये इस्रायलविरोधी भावना भडकत असताना, त्याचा थेट परिणाम भारतातील सामाजिक समरसतेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भारताने तत्पर गुप्तचर, सुरक्षाव्यवस्था आणि धोरणात्मक संयम यांचे मिश्रण वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे.