ओमानजवळ भारतीय जहाजावर अमेरिकेचा हल्ला; ३ नाविक बेपत्ता, सरकारकडून तीव्र निषेध
मिळालेल्या माहितीनुसार, सेटेबेलो नावाच्या जहाजावर अमेरिकन सेंट्रल कमांडच्या आदेशानुसार हल्ला करण्यात आला आहे. पलाउचा ध्वज असलेले हे जहाज इराणच्या दिशेने जात असल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने दिलेल्या सुचनांचे पालन न करण्यात आल्याने हा हल्ला केला. जहाजावर एकूण २४ क्रू मेंबर्स होते यातील तीन जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या बेपत्ता झालेल्या नाविकांचा शोध सुरु आहे.
ओमानमधील भारतीय दूतावास सध्या या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या संबंधित कुटुंबीयांच्या संपर्कात असून भारत सरकारशीही त्यांनी संपर्क साधला आहे. सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारता सरकारने तातडीने अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांच्याकडे कारवाईबाबत स्पष्ट मागितले. भारताने कठोर भूमिका घेत पश्चिम आशियातील व्यापारी जहाजांवर हल्ले थांबवण्याची मागणी केली.
व्यापीर जहाजे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा घटना थांबवण्यास भारताने सांगितले. यामुळे आतरराष्ट्रीय मार्गांवरही वाहतूकही प्रभावित होत असल्याची चिंता सरकारकडून व्यक्त करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत ही भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवरील कारवाईची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरही अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याचे वृत्त आहे. त्या जहाजावरही २४ भारतीय कर्मचारी होते. मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. परंतु ओमानच्या कोस्ट गार्डला वेळेत माहिती मिळाल्याने सर्व भारतीयांना सुरक्षित वाचवण्यात यश आले.
We have learnt of an incident involving a vessel off the coast of Oman. We are closely monitoring the situation and in close touch with the local authorities. We shall update soon. — India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) June 10, 2026






