Hajj 2025: हज यात्रेकरुंसाठी दिलासादायक बातमी; 'या' प्रकरणांमध्ये रिफंडची सुविधा मात्र अटींसह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रियाध: सौदी अरेबियाने 2025च्या हज यात्रेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून यामध्ये यात्रेत मुलांचा प्रवेशास बंदी आहे, तसेच सिंगल एन्ट्री व्हिसा देखील लागून केला आहे, सरकारने पुन्हा एकदा नियमांमध्ये बदल केला आहे. सौदी अरेबियाने हजच्या आरक्षणाची रक्कम काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रवाशांना परत देण्याची घोषणा जाहीर केले आहेत. सौदी अरेबियाने याबाबत एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
बदलले नियम
या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर एखाद्या हज यात्रेकरुचा (पुरुष/महिला) मृत्यू हज यात्रेच्या आधी झाला किंवा ट्रॅफिक अपघातामुळे प्रवास अशक्य झाला, तर संपूर्ण रक्कम त्याच्या पत्नीला परत केली जाईल. तसेच, अपघात झाल्यानंतर शारीरिक अडचणींमुळे हज करता येत नसेल, तर अशा प्रवाशांना देखील रिफंड मिळेल. मात्र, ही योजना केवळ सौदी अरेबियामधील हज यात्रेकरता लागू असेल.
वैद्यकीय रिपोर्ट दाखवावा लागेल
मात्र, यासाठी यात्रेकरुला किंवा त्याच्या कुटूंबीयांना सरकारी रुग्णालयाचा वैद्यकीय रिपोर्ट अनिवार्य असेल. खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट असेल, तर तो सौदी आरोग्य प्राधिकरणाकडून प्रमाणित असावा आणि अरबी भाषेत असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच आरक्षण रद्द करण्यासाठी हज प्रवासी सौदी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नुसुक ॲपद्वारे अप्लाय करु शकतात.
डोमेस्टिक हज आरक्षण
डोमेस्टिक हजसाठी, सौदी सरकारने प्रथमच हज करणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याचे घोषित केले आहे. मात्र, मागील यात्रेत एस्कॉर्ट म्हणून गेलेल्या व्यक्तींना ही अट लागू होणार नसल्याचे सौदीने म्हटले आहे. डोमेस्टिक हज आरक्षणासाठी, प्रवाशांचे नॅशनल कार्ड किंवा रेसिडेन्सी परमिट इस्लामिक कॅलेंडरच्या धुल-हिज्जा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वैध असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी केली जाते हज यात्रा
दरवर्षी धुल-हिज्जा महिन्याच्या सातव्या दिवसापासून हजा यात्रेस सुरुवात होते. या दिवशी हज प्रवासी मक्का शहरात येतात, इहराम परिधान करतात आणि काबाच्या पवित्र परिक्रमा करतात. नंतर सफा आणि मरवा या दोन पवित्र टेकडयांदरम्यान सात वेळा परिक्रमा करतात आणि मीना येथे जाऊन प्रार्थना करतात.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रवासी अराफात पर्वतावर जाऊन प्रार्थना करुन केलेल्या पापांची क्षमा मागतात. त्यानंतर मुजदलिफा येथे रात्रभर विश्रांती घेतात. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जमारात येथे शैतानाचे प्रतीक असलेल्या तीन खांबांवर दगड फेकले जातात.मग पुन्हा मक्काला परत येऊन अंतिम परिक्रमा केली जाते. हजच्या शेवटच्या दिवशी ईद-अल-अजहा म्हणजेच बकरीद साजरी केली जाते.