Pahalgam Terror Attack: भारताशी तणावादरम्यान पाकिस्तान राजकारणात फूट; इम्रान खानच्या PTI पक्षाने घेतला 'हा' निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद:पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमदील तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवरपाकिस्तानच्या राजकारणात मतभेद निर्माण झाले आहेत. पहलगामच्या हदशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यादरम्यान भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकीची घोषणा केली. दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
मात्र माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता इस्लामाबादच्या संसद भवनात राष्ट्रीय असेंब्लीची विशेष आपत्कालीन बैठक होणार आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
پاکستان تحریک انصاف کی سیاسی کمیٹی کا پاک بھارت صورتحال پہ حکومتی بریفنگ پہ مؤقف:
چونکہ یہ محض ایک حکومتی بریفنگ ہے، اور نہ اس میں کوئی قومی اتفاقِ رائے پیدا کرنے کی سنجیدہ کوشش نظر آتی ہے، اور نہ ہی عمران خان جیسے اہم قومی رہنما کو شامل کرنے کی نیت ہے، اس لیے ہم سمجھتے ہیں کہ…
— PTI (@PTIofficial) May 4, 2025
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, सर्व पक्षांचे नेते, मंत्री, तसेच सुरक्षा तज्ञ सहभागी होणार आहेत. या बैठकीदरम्यान भारतासोबत निर्माण झालेला गंभीर तणाव, लष्करी कारवाई आणि देशाच्या सुरक्षेची रणनीती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या बाजूने वळविण्याच्या प्रयत्नांवर चर्चा होणार आहे.
परंतु माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात पीटीआयने सरकार राष्ट्रीय एकजुटीचा कोणताही प्रयत्न न केल्याचा आरोप केला आहे. तसेच इम्रान खाना यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही असे पीटीआयच्या पक्षाने म्हटले आहे. पीटीआय पक्षाने हेही स्पष्ट केले आहे की, त्यांनी दहशतवादाचा निषेध केला आहे. मात्र सरकारने बैठक घेऊन सर्व पक्षांना विश्वासात न घेता केवळ एकतर्फी बैठकीचे आयोजने केले आहे.
दरम्यान भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोदात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात मोठा कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला आहे. तसेच वुलर सरोवराचे आणि चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पाकिस्तानातून देशात आयात-निर्यात थांबवण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानशी असलेले राजनीयक संबंध देखील कमी केले आहेत. देशातील पाकिस्तानी नागरिकांनी परत मायदेशी पाठवण्यात आले असून व्हिसावर बंदी घातली आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. वारंवार पाकिस्ताच्या उच्च नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकी देत आहेत.