परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नेदरलँडमध्ये धोरणात्मक तज्ञांच्या बैठकीत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणापूर्ण वातावरण आहे. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू असून यादरम्यान अनेक मोठ मोठ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताशी मैत्रीच्या नावाखाली एका देशाने पाकिस्तानला मदत पुरवली आहे. यामुळे भारताने संताप व्यक्त केला आहे. नेदरलॅंड्सने भारताच्या पाठिंत खंजीर खुपसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलॅंड्सने एकीकडे भारताशी मैत्रीच्या गप्पा करत असताना पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केला आहे. चीन आणि तुर्कीनंतर पाकिस्तानला लष्करी ताकद वाढवण्यासाठी मदत करणारा देश नेदलॅंड्स आहे. परंतु यामुळे नेदरलॅंड्स मोठ्या अडचणीत सापडला आहे.
नेदरलॅंड्स हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री एक. जयशंकर यांनी युरोप दौरा केला. यावेळी त्यांना नेदरलॅंड्समधील कारवायांचे मुद्दे उपस्थित केले. भारताने तुर्की, अझरैबजान आणि चीनवर कारवाई केली असून आता नेदलॅंड्सला इशारा दिला आहे. भारताने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, एकतर पाकिस्तान सोडा किंवा भारताच्या कठोर कारवायांचा सामना करा.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलॅंड्स तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी १९ मे रोजी नेदरलॅंड्सला भेट दिली. यावेळी त्यांनी नेदरलॅंड्सच्या कारवायांवर भाष्य केले. त्यांनी नेदरलॅंडला इशारा दिला की, एकतर पूर्णपणे भारताला साथ द्या, नाहीतर आमच्या कठोर कारवायांना सामोरे जा. नेदरलॅंड्स हा पाकिस्तानल सर्वाधिक शस्त्रे पुरवणार चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
नेदरलॅंड्स पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री जयशंर यांची भेट झाली. यानंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एकीकडे नेदरलॅंड्स भारतासोबत व्यापार वाढवू इच्छित आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रे पुरवत आहे.सध्या भारत आणि नेदरलॅंड्समद्ये २२ अब्ज डॉलर्सचा व्यापर आहे. तर पाकिस्तानसोबत संपूर्ण युरोपचा १५ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे.
अशा वेळी भारत नेदरलॅंड्सच्या पाठिंत खंजीर खुपण्याचा कृतीमुळे त्यांच्यावर दबाव आणू शकतो. पाकिस्तानला शस्त्रे पुरवण्यापासून रोखू शकतो. डच कंपन्या भारतीय बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करु इच्छित आहेत. ही संधी भारताने नेदरलॅड्सला देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नेदरलॅंड्स दुटप्पीपणाचा मुखवटा हटवले.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानविरोधात कारवाई केली आहे. आता नेदरलॅंड्सलाही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आता नेदरलॅंड्स काय निर्णय घेईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.