आता शेजारील देशाच्या खुरापती भारत सहन करणार नाही...; पाकिस्ताननंतर बांगलादेशला सुद्धा दिला दणका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारताने दहशतवद्यांच्या तळांवर हल्ला करुन पहलगाम हल्ल्या बळी गेलेल्या निष्पाप लोकांना न्याय दिला आहे. दरम्यान पाकिस्तानसोबत उड्या मारणाऱ्या बांगलादेशालाही भारताने जोरदारा झटका दिला आहे. मिळालेल्य माहितीनुसार, भारताने बांगलादेशी घुसखोऱ्यांना पळवून लावले आहे.
द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (07 मे) रोजी 123 घुसखोऱ्यांना बांगलादेशात परत पाठविण्यात आले. रोहिंग्या समुदायचे काही नागरिक सीमा ओलांडून भारताच्या वेगवेगळ्या भागात घुसले होते. या सर्वांना भारतान शोधून काढले आणि त्यांना बांगलादेशात परत पाठिवले आहे. भारताच्या या कारवाईने बांगलादेशमध्ये संताप निर्माण झाला आहे. बांगलादेशच्या मते, नागरिकांना ज्या पद्धतीने पाठविण्यात आले, ते योग्य नाही.
युनूस सरकारच्या अंतर्गत व्यवहार सल्लागार खलीलुर यांनी याची माहिती दिली. त्यांनी ढाकाच्या प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमच्या लोकांना धक्के मारुन हाकलून देण्यात आले आहे. हे योग्य नाही. भारताने आमच्या लोकांना जबदरस्तीने पाठवले आहे.
खलीलुर यांच्या म्हणण्यानुसार, रोहिंग्या समुदायाचे लोक बांगलादेशी नाहीत. तसेच भारत सरकारने त्यांची ओळख न पटवता सीमापार केले आहे. त्यांनी सांगितले की, बांगलादेश पोलिसांनी सर्व 123 घुसखोऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल असेही खलीलुर यांनी म्हटले आहे.
भारत सरकार गेल्या बऱ्याच काळापासून बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात कारवाई करत आहे. भारताच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यंनी म्हटले होते की, 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान बीएसएफने पश्चिम बंगालमधून 2601 बांगलादेशींना पकडले होते. या सर्वांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईलल. या घुसखोऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बांगलादेशी सीमेवर बीएसएफचे जवानांनी कारवाई सुरु केली आहे.
शेख हसीना यांच्या भारतात आश्रयानंतर आणि बांगलादेशच्या हिंदूंवरील अत्याचारानंतर भारतासोबतचे संबंध बिघडलेले आहेत. तसेच बांगलादेशने चीनसोबत मिळून भारताच्या नॉर्थ ईस्ट रांज्यावर ताबा मिळवण्याचा षड्यंत्र रचत होता. यावरुन बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी धक्कादायक विधान केले होते. यावरुन दोन्ही देशांतील संबंध अधिक चिघळले. तसेच बांगलादेशने पाकिस्तानसोबतही मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडींमुळे बांगलादेश आणि भारतमधील संबंध अधिक बिघडले आहेत.