पाकिस्तानात मसूद अझहरचा जैश दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त; हल्ल्यापूर्वीचे आणि नंतरचे दृश्य सॅटेलाईटमध्ये कैद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत मंगळवारच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा गोंधळ उडाला आहे. या हलल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना उद्धस्त करुन टाकले. दरम्यान या हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरचे बहावपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणाचे दृश्य सॅटेलाईट्समध्ये कैद झाले आहे.
या हल्ल्यातील दृश्यांध्ये पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संगटनेचे ठिकाण सुभान अल्लाह हल्ल्यापूर्वी कसे होते आणि हल्ल्यानंतर कसे दिसत आहे त तुम्ही पाहू शकता. या मरकजच्या परिसरात बांधलेल्या मशिदीची तीन घुमट उद्ध्वस्त झाले आहेत, तर दोन घुमट शाबूत आहेत. या छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की परिसरात कचऱ्याचा ढीग दिसत आहे.
Satellite pics from Maxar Technologies show damage caused by Indian missile strikes on Jamia Mosque in Bahawalpur, Pakistan before (Pic 1) and after (Pic 1,2,3) the strike.
(Source: Reuters) pic.twitter.com/9HaBdaBo66
— ANI (@ANI) May 8, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. दहशतवाद्यांन धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या अंतर्गत सैन्याने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उखडून पाडले. भारताचे लष्कर, हवाई दल, आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरच्या परिसरातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यामध्ये मुरिदके, बहावलपूर, कोटली, मुजफ्फरबाद, आणि सियालकोट या ठिकाणांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हा या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. त्यानंतर पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारताने ही कारवाई केली. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली होते की, पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निरापराध लोकांना न्याय मिळेल. दहशतवाद्यांविरोधात आणि त्यांना पोसणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.
भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानन सुधारलेल्या नाही. भारताला पोकळ धमक्या देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे शहीद म्हणून वर्णन केले आहे. शाहबाज यांनी म्हटले आहे की, भारताने मोठी चूक केली आहे. त्यांना याची किंमत मोजावी लागले. शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्यात येईल. यावरुन स्पष्ट होते की, स्वत:ला दहशतवादाचा बळी समजणारा पाकिस्तान प्रत्यक्षात पाकिस्तानला पाठिंबा देतो.