पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आला पुळका; ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या शाहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यात बळी गेल्या 28 निरापराध लोकांना ‘ऑपरेशन सिंदूर’ न्याय मिळवून दिला. भारतीय लष्कराने मंगळवरी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भागातील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे. बिथरलेला पाकिस्तान भारताला केवळ पोकळ धमक्या देत आहे.
या हलल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अस्वस्थ झाालेले आहेत. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भारतला धमकी दिली आहे. शाहबाज यांनी म्हटले आहे की, “भारताने मोठी चूक केली आहे. शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. भारताला मोठी किंमत मोजावी लागेल.”
भारतीय लष्कराच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुदाहिदिन या दहशतवादी संघटनांना लक्ष्य केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुरिदके, बहावलपूर, कोटली, मुजफ्फरबाद, आणि सियालकोट या ठिकाणच्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. जैशचे बहावलपूर येथील मरकज सुभान अल्लाह, कोटीलचे मरकज अब्बास तेहरा कलां आणि मुजफ्फरबादमधील सैदन बिलाल कॅम्प या कारवाईत रद्द करण्यात आला.
याच दरम्यान दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी लष्कर अश्रू ढाळताना दिसून आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अंत्ययात्रेत पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ कमांडर हाफिज अब्दुला, तसेच पंजाब प्रांतातील पोलिस महासंचालक उपस्थित होते. ही माहिती पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या शहीदांच्या (दहशतवादी) रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल अशी धमकी भारताला दिला आहे.
यावरुन पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगासमोर येतो. स्वत:ला दहशतवादाचा बळी समजून घेणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हल्ल्यात बळी गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले होते. या सर्व घटनांवरुन लक्षात येते की, पाकिस्तना दहशतवाद्यांना पोसत आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका, रशिया, या महसत्ता देशांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्यास म्हटले आहे. तसेच तुर्की आणि चीन वगळता इतर मुस्लिम देशांनी पाकिस्तानची साथ सोडली आहे. इतर मुस्लिम देशांनी देखील भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगून संवादाच्या मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.