भारत-पाक-अमेरिका त्रिकोणात नवे राजकारण; शाहबाज शरीफ-मार्को रुबियो भेटीमुळे भारतासाठी वाढतोय का तणाव? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US-Pakistan Relations : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अलीकडेच झालेली उच्चस्तरीय भेट दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी निर्णायक ठरली आहे. या भेटीदरम्यान प्रादेशिक शांतता, इराण-इस्रायल युद्धविराम, तसेच भारत-पाकिस्तान स्थैर्य या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीमुळे भारतासाठी एक नव्या स्वरूपाचा राजनैतिक तणाव निर्माण झाल्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, या चर्चेचा केंद्रबिंदू अमेरिका-पाकिस्तान व्यापार संबंध, पश्चिम आशियातील शांती, आणि दक्षिण आशियातील राजनैतिक समन्वय होता. शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान प्रादेशिक शांततेत रचनात्मक भूमिका बजावत राहील.
या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी ट्रम्प यांच्या “धाडसी आणि निर्णायक नेतृत्वामुळे इराण-इस्रायलमध्ये युद्धबंदी शक्य झाली” असे म्हटले. याशिवाय, भारत-पाक युद्धबंदी घडवून आणण्यात अमेरिकेच्या भूमिकेचे त्यांनी विशेष उल्लेख करून आभार मानले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची गुप्त भेट घेतली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं की, “नरेंद्र मोदी आणि असीम मुनीर या दोघांनीही युद्धबंदीच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली.” मात्र, भारताने या चर्चेत कधीही थेट सहभाग घेतल्याचे संकेत दिलेले नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Israel War : ‘आम्हाला युद्ध नको, पण हल्ले थांबले नाहीत तर….’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलवर उठवली टीकेची झोड
भारताने पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेबाबत नेहमीच कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराच्या आक्रमक आणि तडाखेबाज कारवायांमुळे पाकिस्तान एकतर्फी युद्धबंदी जाहीर करण्यास भाग पाडले गेले होते. त्यानंतर, पाकिस्तानने अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारताशी मध्यस्थीसाठी विनंती केली होती. ही माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही नुकतीच दिली आहे.
Prime Minister Muhammad Shehbaz Sharif held a telephonic conversation with U.S. Secretary of State Marco Rubio
• Prime Minister Praised President Trump’s leadership & Secretary Rubio’s diplomacy in facilitating Pakistan – India ceasefire understanding. pic.twitter.com/oxVtUHfLSV
— Shehbaz Digital Media (@ShehbazDigital) June 21, 2025
credit : social media
अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली ही रणनीतिक प्राधान्याची वागणूक भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. दक्षिण आशियात चीन-पाकिस्तान युती, त्यावर अमेरिकेच्या नवा झुकाव, आणि पारंपरिक युद्धबंदीच्या रचनेत भारताचा तिसऱ्या बाजूने उल्लेख, हे सर्व घटक भारताच्या राजनैतिक धोरणासाठी नव्या आव्हानांची सुरुवात ठरू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
या बैठकीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका, पाकिस्तान आणि इतर पाश्चात्त्य शक्ती भारताकडून अधिक लवचिकता अपेक्षित ठेवू शकतात. मात्र, भारताने आतापर्यंत स्पष्ट केले आहे की शांतता ही विश्वास आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील ठोस कृतीवर आधारित असावी, दबाव किंवा मध्यस्थीवर नाही. यामुळे भारताला येत्या काळात अमेरिकेशी धोरणात्मक संवाद अधिक गतीने आणि स्पष्टतेने साधण्याची गरज भासणार आहे, अन्यथा पाकिस्तान पुन्हा एकदा शांततेच्या मुखवट्याआड आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल.