एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानने भारताकडे पुन्हा एकदा सिंधु पाणी करारावरील स्थगिती हटवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिंधू जल कराराच्या पूर्ण अंमलबजावणीचे आणि लवाद न्यायालयाच्या स्पष्टीकरणाचे स्वागत केले आहे. पण, अद्याप भारताने लवाद न्यायालयाला मान्यता दिलेली नाही, तसेच न्यायालयाच्या कारवाईला देखील मान्यता दिलेली नाही.
अभिमानास्पद! अमेरिकन मुलाने गायले भारताचे राष्ट्रगीत; व्हिडिओ पाहून कराल कौतुक, VIDEO VIRAL
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, भारताला सिंध पाणी करार त्वरित पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने या कराराच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराव्यात असे म्हटले आहे.पाकिस्तानने Court of Abitration च्या बेवसाइटवर प्रसिद्ध झालेल्या सिंधू पाणी कराराच्या अहवालाचे स्वागत केले आहे.
या अहवालात चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर बांधण्यात आलेल्या नवीन जलविद्युत प्रकल्पाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानला कोणत्याही अडथळ्यांशिवाय पाणी पोहचवावे असे सांगण्यात आले आहे. तसेच या कराराचे नियम भारताने पाळले पाहिजेत असे सांगण्यात आले आहे. यामध्ये भारताने या नद्यांवर निर्माण केले अडथळे भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करारचे मोठे उल्लंघन असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
याच वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारताला अणु हल्ल्याची धमकी देत आहेत. असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्यांदा भारतासह संपूर्ण देशाला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. सिंधु पाणी करारावरुनही भारताविरोधी विधान केले आहेत. तसेच बिलावल भुट्टो यांनी देखील सिंधु पाणी करारावरुन भारताला युद्धाची धमकी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी कारवाई केली होती. यावेळी देखील पाकिस्तानच्या अणु हल्ल्याच्या धमक्या सुरुच होत्या. ही पाकिस्तानची एक जुनी सवय आह. सतत अण्वस्त्रांच्या हल्ल्याची धमकी पाकिस्तानी अधिकारी देत राहतात. परंतु भारताने पाकिस्तानच्या या धमक्यांना बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे कारण काय आहे?
तसे पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक काळांपासून तणाव आहे. परंतु २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे.
काय आहे सिंधु जल करार?
भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधु जल करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाईल. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण असेल.
‘या’ छोट्या आफ्रिकन देशाने ट्रम्पला दाखवला ठेंगा ; हद्दपार स्थलांतरितांना घेण्यास दिला नकार






