पाकिस्तानची दुतोंडी रणनीति! एकीकडे अमेरिकेचे गुणगाण, दुसरीकडे इराणच्या अणु प्रकल्पाला पाठिंबा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : सध्या इराणचे (Iran) अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या (Pakistan) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. या दरम्यान दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. दरम्यान यावेळी पाकिस्तानने एक मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणच्या न्यूक्लियर प्रोगामला पाठिंबा दिला आहे. मात्र या पाठिंब्यामुळे अमेरिका संतप्त होण्याची शक्यता आहे.
इराण हा इस्रायलचा मोठा शत्रू आहे. यामुळे इस्रायल अमेरिकेचा मित्र असल्यामुळे अमेरिकेने देखील इराणला आपला शत्रू मानले आहे. शिवाय इराणच्या न्यूक्लियर प्रोगामला अमेरिकेनेही विरोध केला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमाला अमेरिकेने धोकादायक मानले असून याला त्यावर निर्बंध लादले आहे. नुकतेच इस्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेने देखील इराणच्या अणु तळांवर हल्ला केला होता. यामध्ये इराणचे फोर्डो, नतान्झ, आणि इस्फाहान हे तीन अणुस्ळे नष्ट झाली होती.
रविवारी (०३ ऑगस्ट) इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शाहबाज यांनी अराणच्या न्यूक्लियर प्रोगामला पाठिंबा दिला. पाकिस्तानने म्हटले की, इराणचा अणु कार्यक्रम शांततेसाठी आहे. हा कार्यक्रम अणुउर्जा विकसित करण्यासाठी असून इराणला याचा पूर्ण अधिकार आहे, यामुळे या कार्यक्रमाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे शाहबाज यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या पाठीत पाकिस्तानने खुपसला खंजीर
दरम्यान इराणच्या अणु कार्यक्रमाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्याने अमेरिकेला धक्का बसला आहे. अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) आधीच इराणच्या अणु कार्यक्रमाच्या विरोधत आहे. इराणच्या अणु प्रकल्पाला प्रादेशिक सुरक्षेसाठी अमेरिकेने धोकादायक म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने यावर बंदी घातली होती. तसेच ब्रिटन, फ्रान्स, इटली यांसारखे युरोपीय देश देखील इराणच्या या प्रकल्पाला धोकादायक मानतात.
दरम्यान पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला असून याला अमेरिकेविरोधी पाऊल मानले जात आहे. शिवाय एककीडे पाकिस्तानचे जनरल प्रमुख अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सोबत डिनर करत आहेत, अमेरिकेची स्तुती करत आहेत. तर दुसरीकडे त्याच्या शत्रू देशाला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. यामुळे पाकिस्तान नेमका कोणता खेळ खेळत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका संबंधांमध्ये पुन्हा कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.