व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक (फोटो सौजन्य: एक्स/@MEAIndia)
भारत आणि व्हेनेझुएलाच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उर्जा, व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. यामुळे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
या वेळी भारताने देशाच्या उर्जा सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले. सध्या होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे भारतात कच्चे तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे भारत सध्या व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत आहे. भारतीय कंपन्यांनी व्हेनेझुएलाच्या उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक मोठा तेल उत्पादक देश असून भारतासाठी युद्धजन्य परिस्थिती उत्तम पर्याय ठरत आहे. याशिवाय औषधनिर्मिती, वाहन उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातही संबंध दृढ करण्याचे निश्चित करण्यात आले.
PM @narendramodi held wide-ranging discussions with Acting President Delcy Rodríguez of Venezuela today. The leaders reviewed the full spectrum of bilateral relations and explored new avenues of cooperation in energy, trade, investment, healthcare, automobiles among others. The… pic.twitter.com/bZRie0kUZG — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 4, 2026
रॉड्रिग्ज यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर रॉड्रिग्ज यांनी द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली.
Pleased to call on Acting President Delcy Rodríguez of Venezuela in New Delhi today. Deeply value her longstanding commitment to the India – Venezuela relationship. Her meeting with PM @narendramodi will further strengthen our cooperation. 🇮🇳 🇻🇪 pic.twitter.com/kMkR9hYcVy — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 4, 2026
दरम्यान रॉड्रिग्ज यांनी दुपारी राजाघाटावर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देत आदरांजली वाहली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, महात्मा गांधीचे विचार दोन्ही देशांच्या भागीदारी वाढविण्यासाठी प्रेरणा देतात.
A tribute to the lasting legacy of Bapu. Acting President Delcy Rodriguez of Venezuela paid homage to Mahatma Gandhi at Rajghat this afternoon. Bapu’s ideals continue to inspire India-Venezuela partnership. pic.twitter.com/HF8tiRellu — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 4, 2026






