मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडणं पडलं महागात ; श्रीलंकन नौदलानकडून अटक, बोटीही जप्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चेन्नई: भारत आणि श्रीलंकेची सागरी सीमा ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेला परवानगीशिवाय ओलांडणे कायद्याने गुन्हा मानला जातो. दरम्यान तामिळनाडूतील रामेश्वरमच्या मच्छीमारांना मासेमारीसाठी ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणे महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मच्छामारांना श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे (IMBL) उल्लंघन केले आहे. यामुळे या मच्छामारांना श्रीलंकेने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२२ जुलै) पहाटे काही मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी मच्छामारांनी भारत आणि श्रीलंकेची आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. मात्र याचवेळी श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना अडवले आणि अटक केली.
या घटनेमुळे भारताची चिंता वाढली आहे. आयएमबीएलने अवैध मासेमारीच्या आरोपाखाली चार भारतीय मच्छीमारांना सीमा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी सीमारेषेजवळ पकडले आहे. नौदलाने मच्छीमारांना अटक केली असून त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना श्रीलंकेच्या नौदल तळावर नेण्यात आले आहे. सध्या या मच्छामारांविरोधात श्रीलंकेकडून कडक कारवाई केली जात आहे.
सध्या या घटनांमध्ये तामिनाडूत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत शेकडोहून अधिक लोकांना सागरी सीमारेषा ओलांडताना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या नौदलाने २०२४ या वर्षात ४६२ मच्छीमाराना अटक केली होती, तर ६२ बोटी जप्त केल्या होत्या विशेष करुन तामिळनाडूच्या रामनाथपुरमच्या सागरी किनारी भागात या घटना घडल्या आहेत. यामध्ये मच्छामारांच्या समुदायात चिंता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. मच्छीमारांना उदरनिर्वाहासाठी सोमा ओलांडावी लागते असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान या घटनेनंतर स्थानिक मच्छामार संघटनांनी श्रीलंकन नौदलावर तीव्र टीका केली आहे. तसेच यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे. दीर्घकाळापासून हा वाद सुरु असून याचे निराकरण करणे गरजेचे असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
तसेच संघटनांनी यावर द्विपक्षीय चर्चा आणि राजनैतिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या घटनांमध्ये मच्छामारांच्या जीवन आणि साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. या घटनांमुळे भारत आणि श्रीलंकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.