इराणने भारतीय विद्यार्थ्यांना अटक केली; सोशल मीडियावरील गोंधळानंतर राजदूतांनी सत्य उघड केले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Indian students in Iran safety news 2026 : इराणमध्ये (Iran) सध्या सुरू असलेल्या अंतर्गत निदर्शने आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर भारतीय विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. “इराण सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना अटक केली आहे,” अशा दाव्यांमुळे भारतात असलेल्या पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण आले असून या सर्व बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर स्पष्ट केले की, काही विदेशी हँडल्स मुद्दामून चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. “कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही. या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, केवळ अधिकृत आणि सत्यापित स्रोतांवरच विश्वास ठेवावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर; 1000 सुसाईड बॉम्बर तयार, Masood Azharचा ‘ऑडिओ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान
इराणमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण (MBBS) घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत वाढती चिंता पाहून ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन (AIMSA) आणि FAIMA या संघटनांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. AIMSA चे उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद मोमीन खान यांनी सांगितले की, “आम्ही इराणमधील विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सर्व भारतीय विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुरक्षित आहेत. कोणत्याही पालकांनी अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही.”
Shocking. Iranian families searching for loved ones killed during the ongoing anti-government protests in Iran at the Kahrizak Forensic Medical Center, south of the Iranian capital of Tehran. During the video, a screen can be seen inside the building which shows an image counter… pic.twitter.com/bE50fw7Fxy — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 11, 2026
credit : social media and Twitter
अनेक विद्यार्थी स्वतः आपल्या घरी फोन करून सुरक्षित असल्याची माहिती देत आहेत. इराणमधील इंटरनेट सेवा अधूनमधून खंडित होत असल्याने पालकांशी संपर्क होण्यास काही अडथळे येत आहेत, ज्याचा फायदा अफवा पसरवणाऱ्यांनी घेतला. मात्र, भारतीय दूतावास तेहरानमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत चर्चा करत असून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL
इराणमध्ये सध्या अंतर्गत अस्थिरता असली तरी, परदेशी विद्यार्थ्यांना किंवा पर्यटकांना लक्ष्य केले जात नसल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे. चुकीची माहिती पसरवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे इराणचे म्हणणे आहे. अशा संवेदनशील काळात सोशल मीडियावरील माहितीची पडताळणी केल्याशिवाय ती शेअर न करणे हेच सर्वांच्या हिताचे आहे.
Ans: नाही, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. इराणचे राजदूत आणि भारतीय वैद्यकीय संघटनांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
Ans: भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे आणि परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
Ans: पालकांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) किंवा तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवर विश्वास ठेवावा.






