रशिया : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे (Ukraine Russia war)भारतातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मध्येच सोडाव लांगलं होतं. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता या विद्यार्थ्यांना त्यांच शिक्षण पुर्ण करण्यासाठी रशिया मदत करणार आहे. रशियाच्या साहाय्याने आता भारतीय विर्द्यार्थ्यांच (Indian Students) शिक्षण पुर्ण होणार आहे.
[read_also content=”पुणेकरांनो आता घरात मांजर पाळायचं असेल तर आधी महापालिकेची परवानगी घ्या! https://www.navarashtra.com/maharashtra/for-keeping-cat-at-home-permission-from-the-municipal-corporation-is-mandatory-nrps-343522.html”]
शिक्षणासाठी भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी मध्ये जातात. युक्रेनमध्येही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी जातात. मात्र गेल्या काही महिण्यापासून युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक विद्यार्थांना त्यांच शिक्षण अर्धवट सोडून यावं लागलं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.
[read_also content=”वर्धा येथील दुर्घटना; ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडले https://www.navarashtra.com/crime/accident-at-wardha-on-duty-traffic-police-officers-were-ripped-apart-by-trucks-nrgm-343520.html”]
नुकतीच रशियन कॉन्सुल जनरल ओलेग अवदीव यांनी भारताला भेट दिली. चेन्नईमध्ये आले असता त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण सुरू पूर्ण करु शकतात असं सांगितलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच शिक्षण पुर्ण करण्याची संधी मिळाली आहे.
भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त असल्यांच सांगणयात येतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनला पसंती असते. तर, भारतात खासगी महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लाखाेंचा खर्च असतो. त्याऐवजी युक्रेनमध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेणं पसंत करतात.