Iran Secret Nuclear Program Like a Jigsaw Puzzle Plan
वॉशिंग्टन: सध्या इराणच्या गुप्त अणु कार्यक्रमामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रोस यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. ग्रॉसी यांनी इशारा दिला आहे की, इराणने अण्वस्त्रे बनवण्यास सुरुवात केली आहे. ग्रॉस यांनी दिलेल्या इशाऱ्याने अमेरिकेपासून ते सौदी अरेबियापर्यंत सर्व देशांमध्ये गोंधळ उडाला आहे. सध्या ग्रोस इराणच्या दौऱ्यावर असून त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे, इराण लवकरच अण्वस्त्रांचे सर्व तुकडे एकत्र करून निर्मिती पूर्ण करेल.
याशिवाय इराणने अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे सर्व घटकही तुकड्यांच्या स्वरुपात तयार केले आहेत. इराण अनेक वर्षांपासून अण्वस्त्रे बनवण्यावर कार्य करत आहे. अमेरिकेने यावर कडक निर्बंध लागू केले. तसेच अणु प्रकल्पात अनेक अडथळे निर्माण करण्यासाठी धमक्या दिल्या आहेत. परंतु तरीही गुप्त मार्गने युरेनियमचा साठा करुन इराणने अण्वस्त्रे बनवण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सध्या परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.
आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रॉसी यांच्या म्हणण्यानुसार, इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून थांबावायचे असल्यास कोणत्याही अणुकरार IAEA सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. तो केवळ एक औपचारिक कागद असेल. सध्या अमेरिका इराणच्या अणु कार्यक्रमांवर आळा घालण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी इराणला अमेरिकेने थेट चर्चेची ऑफर दिली आहे.
अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, इरणच्या अणु कार्यक्रमाला प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी धोका निर्माण करणारे म्हटले आहे. इराणने अणुबॉम्ब तयार केल्यास मध्ये पूर्वेत शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे इतर अनेक देश अण्वस्त्रे बनवण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न करतील. याचा थेट परिणाम जागतिक शांततेवर होणार आहे.
सौदी अरेबियाने देखील अनेक वेळा इराणच्या अणु कार्यक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने अण्वस्त्रे विकसित केली तर सौदी अरेबिया देखील अणुबॉम्ब मिळवण्याच्या दिशेने पाऊल उचलेले.
सौदी अरेबियाने विश्वास व्यक्त केला आहे की, इराणचा अणु कार्यक्रम केवळ नागरिसेवेसाठी मर्यादित नाही. इराणच्या अण्वस्त्रे बनवण्याच्या धोरणामागचा उद्देश अणुबॉम्ब तयार करणे आहे. यामुळे इराणने अण्वस्त्रे तयार केल्यास संपूर्ण खाडी देशांमध्ये असुरक्षितता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन IAEA, अमेरिका आणि इतर जागतिक शक्तींनी वेळेवर पावले उचलण्याची गरज आहे. असे न झाल्यास भविष्यातील परिणाम अत्यंत घातक ठरतील.