इराणचा आक्रमक पवित्रा! युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान इस्रायली गुप्तहेराला फाशी, मध्यपूर्वे पुन्हा पेटणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या न्यायव्यवस्थेने सुलतान अली शिरजादी फख्र नावाच्या व्यक्तीला फाशी दिली आहे. याची अधिकृत पुष्टीही करण्यात आली आहे. या व्यक्तीवर इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेसोबत मिळून इराणची हेरगिरी केल्याचा आणि दहशतवादी कायद्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईच्या अवघ्या २४ तासांपूर्वीच मेहदी फरीद नावाच्या अन्य एका व्यक्तीलाही याच आरोपांखाली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. इराणमधील अंतर्गत विरोध आणि युद्धजन्य परिस्थितीमुळए सध्या सरकार देशविरोधी व्यक्तींविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत.
दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आला असून येत्या तीन दिवसांत इराणसोबत शांतता चर्चेचे संकेत ट्रम्प यंनी दिले आहे. मात्र इराणने त्यांच्या जहाजांची नाकेबंदी थांबत नाही तोपर्यंत कोणत्याही चर्चेस नकार दिला आहे. यामुळे युद्धविराम होणार का नाही यावर संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे.
एकीकडे शांततेच्या चर्चांणा उधाण आले असताना इराण(Iran)ने मात्र चिथावणीखोर कारवाया केल्या आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमद्ये तीन व्यापारी जहाजांवर गोळीबार केला आहे. इराणच्या या कृतीमुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला आहे. यामुळे शांतता चर्चांमध्ये अडथळा येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
युद्धविरामाच्या चर्चांदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांनी एक ऑडिओ मेसेज जारी करत अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. राजनैतिक चर्चेत इराणची कोणत्याही प्रकारे फसवणुक झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे खामेनेईंनी म्हटले आहे. वाटाघाटींशी विश्वासघात केला, तर अमेरिका आणि इस्रायलच्या राजवटींना आणि त्यांच्या लष्करी आक्रमणाच्या सूत्रधारांना असा धक्का बसेल, ज्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत.






