World War 3: मध्यपूर्वेत महायुद्धाची नांदी? Donald Trump यांच्या एका इशाऱ्यानंतर 'हे' आठ मुस्लिम देश आता इराणच्या रडारवर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US military bases in Middle East list 8 countries : जागतिक राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या अंतर्गत उठावांना आणि जनआक्रोशाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उघड पाठिंबा दिल्याने इराण संतप्त झाला आहे. इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी रविवारी अमेरिकेला थेट इशारा दिला की, जर वॉशिंग्टनने तेहरानवर लष्करी कारवाई केली, तर मध्यपूर्वेतील बहरीन, कतार, सौदी अरेबियासह ८ देशांमधील अमेरिकन लष्करी तळ आणि इस्रायल इराणच्या क्षेपणास्त्रांचे पहिले लक्ष्य असतील.
इराणमध्ये महागाई आणि स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत ५३८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसेवर भाष्य करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर म्हटले आहे की, “इराण आता स्वातंत्र्याकडे पाहत आहे आणि जर सरकारने आपल्याच लोकांची कत्तल केली, तर अमेरिका हस्तक्षेप करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.” इतकेच नाही तर, इराणमधील ‘इंटरनेट ब्लॅकआउट’ तोडण्यासाठी ट्रम्प यांनी अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याशी ‘स्टारलिंक’ सॅटेलाइट इंटरनेट पुरवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे, ज्यामुळे इराणची सत्ताधारी राजवट अधिकच संतप्त झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : जगाचा नकाशा बदलणार? NATOने केले बंड; Greenlandसाठी जर्मनी मिलिटरी युद्धसज्ज, ट्रम्प मात्र अस्वस्थ
अमेरिकेचे मध्यपूर्वेत सुमारे ४०,००० ते ५०,००० सैन्य तैनात आहे. इराणने इशारा दिलेले ८ देश खालीलप्रमाणे आहेत:
१. कतार: येथील ‘अल उदेद’ हवाई तळ हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अमेरिकन तळ आहे.
२. बहरीन: येथे अमेरिकन नौदलाच्या ५ व्या फ्लीटचे मुख्यालय आहे, जे सागरी मार्गांवर लक्ष ठेवते.
३. कुवेत: ‘कॅम्प आरिफजान’ हे अमेरिकेचे महत्त्वाचे रसद आणि पुरवठा केंद्र आहे.
४. सौदी अरेबिया: ‘प्रिंस सुलतान’ हवाई तळ इराणच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या थेट टप्प्यात आहे.
५. संयुक्त अरब अमिराती (UAE): अबु धाबी जवळील ‘अल धाफ्रा’ तळ हवाई कारवायांसाठी महत्त्वाचा आहे.
६. इराक: अनबार प्रांतातील ‘ऐन अल-असद’ तळावर यापूर्वीही इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
७. जॉर्डन: ‘मुवफ्फक अल-साल्टी’ हवाई तळ सीरिया आणि लेव्हंट प्रदेशातील कारवायांचे केंद्र आहे.
८. इजिप्त: येथे अमेरिकेची महत्त्वाची वैज्ञानिक आणि तांत्रिक युनिट्स कार्यरत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: पुन्हा सुरु होणार भारत-पाक युद्ध? पाकड्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आकाशमार्गे ड्रोनसोबत पाठवला ‘मृत्यू संदेश’; पहा VIDEO
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ज्या प्रकारे सत्तेवरून खेचले, त्यामुळे इराणच्या नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इराणचे नेते हसन रहिमपूर अझघादी यांनी तर ट्रम्प यांना ‘मादुरोप्रमाणेच उचलून अटक’ करण्याची धमकी दिली आहे. पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना इराणमधील लष्करी लक्ष्यांची आणि ‘सायबर शस्त्रांच्या’ वापराची माहिती दिली आहे, ज्यामुळे कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते.
Ans: इराणने बहरीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
Ans: इराण सरकारने इंटरनेट बंद केल्याने ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक' सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा केली आहे.
Ans: इराण इस्रायलला अमेरिकेचा सर्वात मोठा प्रादेशिक हस्तक मानतो. अमेरिकेने हल्ला केल्यास इराण इस्रायलमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागण्याचा इशारा दिला आहे.






