Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा 'तो' निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, इराणने ८०० हून अधिक लोकांच्या फाशीची शिक्षा रद्द केली आहे. याबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभारा मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांतील युद्धाची परिस्थिती पाहता ट्रम्प यांचा हा यु-टर्नमुळे जागतिक राजकारणात चर्चांणा उधाण आले आहे.
इराणमध्ये २८ डिसेंबर २०२५ पासून तीव्र निदर्शने सुरु होती. सरकारवरील वाढत्या अविश्वासामुळे, देशातील आर्थिक संकट, रियालची घसरण, महागाई याविरोधात जनतेने बंड पुकारला होता. सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर केला, ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले. सरकारच्या कारवाईत २००० हून अधिकांचा बळी गेला. तसेच अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि अंतर्गत परिस्थिती पाहता इराणने फाशीच्या शिक्षा रद्द केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्रुथवर पोस्ट करत लिहिले आहे की, इतक्या मोठ्या संख्येने फाशीची शिक्षा रद्द होणे एक चांगली बाब आहे, सकारात्मकतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. इराणच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे मवाळ सुर पाहून अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच लष्करी कारवाईचे संकेत अमेरिकेडून मिळाले होते. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान तज्ज्ञांच्या मते, मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया (Saudi Arabia), कतार (Quatar) या अमेरिकेच्या मित्र देशांनी इराणवर कारवाई झाल्यास युद्ध भडकण्याचा इशारा दिला होता. याच कुटनीतिक दबावापुढे अमेरिका झुकली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु यामुळे इस्रायलकडून मात्र यावर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या मते इराणने हा निर्णय केवळ वेळ मिळवण्यासाठी घेतला आहे. यामुळे नेतन्याहूंनी इराणच्या हेंतूवर संशय व्यक्त केला आहे.
Ans: इराणने शेकडो फाशीच्या शिक्षा रद्द केल्याने इराणचे आभार मानले आहेत.
Ans: इराणने आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता ८०० फाशीच्या शिक्षा रद्द केल्या आहेत.
Ans: इराणच्या या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थिती काही काळासाठी टळली आहे. धोका अद्यापही कायम आहे.






