फोटो सौजन्य: सोशल मीडिया
काहिरा: इस्त्रायल हमास युद्ध अद्याप सुरू आहे. इस्त्रायल गाझामध्ये हमासाच्या ठिकाणांना सतत लक्ष्य करत असून इस्त्रायलने पुन्हा एकदा उत्तरी गाझावर बॉम्ब वर्षाव केला आहे. उत्तरी गाझामध्ये एका घराला लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये 13 जणांचा जीव गेला असल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता. तसेच बीट लाहिया शहरात देखील रात्रभर हल्ले करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षाभरापासून युद्ध सुरू
मात्र, इस्त्रायलने अद्याप या हल्ल्यांबात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. इस्त्रायल उत्तरी गाझावर ऑक्टोंबरच्या सुरूवातीपासून सातत्याने हल्ले करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यामध्ये आठ जण एकाच कुटूंबातील होते. तसेच मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर या युद्धाला सुरूवात झाली. आत्तापर्यंत इस्त्रालवर हमासने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गाझामध्ये 250 लोकांचे अपहरण करण्यात आले असून गाझात 100हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गाझा पट्टीत एकही क्षेत्र सुरक्षित नाही
पॅलेस्टिनींना भारताची साथ
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी आणि पश्चिम आशियात व्यापक, न्याय व शाश्वत शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. 193 सदस्यीय महासभेत सेनेगलने मांडलेला “पॅलेस्टिनी प्रश्नाचे शांततामय समाधान” असा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
या प्रस्तावाला भारतासह एकूण 157 देशांनी मंजूरी दिली. दरम्यान, इस्रायल, अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरी, माइक्रोनेशिया, नाउरू, पलाऊ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी प्रस्तावाला विरोध केला आहे. तर कॅमेरून, झेकिया, इक्वाडोर, जॉर्जिया, पॅराग्वे, युक्रेन आणि उरुग्वे या देशांनी मतदान टाळले.