इस्रायली पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांमध्ये तीव्र वाद; नेतन्याहूंचा 'तो' आदेश मानन्यास आर्मी चीफने दिला नकार, काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel News Marathi : जेरुसेलम : सध्या इस्रायलच्या (Israel) गाझामध्ये लष्करी कारवाया सुरु आहेत. याच इस्रायलमध्ये तीव्र वाद सुरु झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu)आणि लष्करप्रमुख यांच्यामध्ये गाझातील कारवाई वरुन वाद सुरु आहे. पंतप्रधान नेतन्याहूंच्या एका योजनेला लष्करप्रमुखांनी विरोध केला आहे. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. नेतन्याहूंना गाझावर पूर्णत: ताबा मिळवायचा आहे. यासाठी त्यांनी एक योजना आखली आहे.
परंतु तीन इस्रायली अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. अधिकाऱ्यांचे मते, गाझामध्ये इस्रायलचे आधीच नियंत्रण नाही, यामुळे गाझावर ताबा मिळवून इस्रायला काहीही फायदा होणार नाही. लष्कराला गाझाच्या भागांवर नियंत्रण मिळवण्याची योजना मान्य नाही, असे इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (०५ ऑगस्ट) इस्रायली पंतप्रधान आणि देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन सा सुरु होती. या बैठकीत इस्रायलचे पंतप्रधान आणि लष्करामध्ये तीव्र वाद झाला आहे. लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी नेतन्याहूंच्या गाझावरील ताब्याच्या योजनेला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझाचा उर्वरित भागामध्ये कारवाया करण्याची गरज नाही, या भागामध्ये सैन्याला अडकवले जाऊ शकते.
इस्रायली ओलिसांना धोका
एयाल झमीर यांनी, उर्वरित भागातून सैन्य माघारी घेतली आहे. परंतु यामुळे गाझामध्ये असलेल्या इस्रायली ओलिसांना धोका निर्माण झाले असल्याचे झमीर यांनी म्हटले आहे. नेतन्याहूंनी दोन दशकांपूर्वी या भागांमधून सैन्य माघारी बोलावले होते, परंतु आता पुन्हा या भागांवर ताबा मिळवण्याची योजना त्यांनी आखली आहे.
सध्या इस्रायलचे गाझाच्या (Gaza) ७५ टक्के भागावर नियं६ण आहे. परंतु आता उर्वरित भागांवरही नेतन्याहूंनी ताबा मिळवण्याची योजना आखली आहे. नेतन्याहूंची ही योजना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओलिसांची सुटाका करण्यासाठी आणि गाझामध्ये इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
याच वेळी गाझात उपासमारीमुळे लाखोंचा बळ जात आहे, यामध्ये विशेष करुन लहान मुलांचा समावेश आहे. मात्र नेतन्याहूंनी गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा अट्टाहास धरला आहे. मात्र लष्कर याला विरोध करत आहे. यामुळे सध्या इस्रायलमध्ये राजकीय आणि लष्करामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब? अमेरिकेला होणार अब्जावधी डॉलर्सचा फायदा?