Tahawwur Rana's extradition: तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर इस्रायलची प्रतिक्रिया; म्हणाला, 'भारताचे...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: अखरे मुंबई 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचे भारतात प्रर्त्यापण झाले. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. दरम्यान राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर इस्त्रायलची प्रतिक्रिया समोर आली आहे. इस्त्रायलने आनंद व्यक्त केला आहे.
काय म्हणाला इस्त्रायल?
भारतातील इस्त्रायली राजदूत रुवेन अझर यांनी यावर एक अधिकृत निवदेन जारी केले आहे. त्यांनी निवेदनात भारत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी भारत सरकारच्या दहशतवाद्यांना न्यायालीयन कोठडीत आणण्याच्या आणि दहशतवाद्यांमुळे अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृढनिश्चयाबद्दल आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करतो.
इस्त्रायलने भारतासाठी दहशतवादी लढाईच्या विरोधात हे एक मोठे पाऊल यश असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायलने म्हटले आहे की, हे एक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आणि दहशतवादाविरुद्ध च्या वचनबद्धतेचे महत्वाचे पाऊल आहे.
तहव्वुर राणा हा मुंबई हल्ल्यांतील मूख्य सूधारांपैकी एक आहे. अमेरिकन न्यायलयाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणासाठी 9 एप्रिल रोजी मान्यता दिली. त्याचे भारतात आगमन झाले असून NIA च्या मुख्यालयात दाखल केले जाईल. नंतर वैद्यकीय तपासणी करण्याच येईल आणि थेट पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केले जाऊ शकते.
दहशतवादी राणाचे प्रत्यार्पण केवळ कायदेशीर मुद्द नसून भारत-अमेरिकेच्या दृढ संबंधांचा पुरावा आहे. पण सध्या भारतासमोर मोठे आव्हान आहे. भारताला कायदेशरी जबाबदारीचे पालन करत न्यायालीयन प्रक्रिया पाररदर्शक आणि निष्पक्ष ठेववी लागणार आहे. सध्या त्याच्या मुबंई हल्ल्याशी संबंधित आरोपांवर खटल्याची तयारी NIA कडून केली जात आहे.